घरमुंबईमुंबईत मुसळधार पाऊस...

मुंबईत मुसळधार पाऊस…

Subscribe

सोमवार रात्री पासून संततधार सुरु असलेल्या पावसाचा जोर वाढल्याने, पावसामुळे मुंबईत सर्वत्र पाणी साचले आहे. रेल्वे रुळ तसेच अनेक परिसरात रस्त्यांवर पाणी तुंबल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे.

सोमवार रात्री पासून मुंबई आणि उपनगरामध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. पावसामुळे मुंबईतील अनेक सखोल भागात पाणी साचले आहे. अंधेरी, गोरेगाव, भांडुप, मुलुंड, चेंबुर, कुर्ला, माटुंगा, सायन, घाटकोपर, दादर, हिंदमातासह संपूर्ण मुंबईत मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने रेल्वे तसेच रस्ते वाहतुकीवर खूप परिणाम झाला. रेल्वे रुळांवर पाणी साचल्यामुळे रेल्वे वाहतुक विस्कळीत झाली आहे. रेल्वे उशिराने धावत आहेत.

rain in railway station
सायन ते कुर्ला रेल्वे मार्गावरील रुळांवर साचलेले पाणी

सायन ते कुर्ला रेल्वे मार्ग

सायन रेल्वे स्टेशन ते कुर्ला रेल्वे मार्गाच्या रुळावर पाणी तुंबल्याने लोकल सेवेवर मोठा परिणाम झाला आहे. रेल्वे स्टेशनला नदीचे स्वरुप आले आहे. रेल्वे रुळांवर साचलेल्या पाण्यामुळे मोटरमनला रेल्वे गाडी चालविणे कठीण झाले आहे. त्यामुळे रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे.

- Advertisement -
hindmata area
हिंदमाता परिसरात साचलेले पाणी

हिंदमाता परिसर

पावसामुळे हिंदमाता परिसरात देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. हिंदमाता परिसरात तर काही भागात गुढघ्या पर्यंत पाणी साचले आहे. मोठ्या प्रमाणात रोडवर साचलेल्या पाण्यामुळे पादचाऱ्यांना पाण्यातून वाट काढणे कठिण झाले आहे. तर काही ठिकाणी गाड्या पाण्यात अडकल्याच्या घटना घडत आहेत.

King Circle
किंग्स सर्कल परिसर

माटुंगा 

माटुंगा मार्केट परिसरात आणि किंग्स सर्कल मधील परिसरात पावसामुळे पूर स्थिती निर्माण झाली आहे. पादचाऱ्यांना  गुढघाभर पाण्यातून चालणे कठीण झाले आहे. तर चार चाकी गाड्या चालकांना देखील गाडी चालवणे अडचणीचे ठरत आहे.अत्यवश्यक सेवा देणाऱ्या रुग्णवाहिकांना देखील मार्ग काढण्यात अडथळा येत आहे.

- Advertisement -
Ambulance under king's circle bridge
किंग्स सर्कल परिसरातील पाण्यातून वाट काढणारी रुग्णवाहिका

शाळेला सुट्टी

सोमवार रात्री पासून सतत सुरु असलेल्या पावसामुळे सावधगिरी म्हणून मुंबईतील अनेक शाळेंकडून शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान भारतीय हवामान खात्याकडून ४ जुलैला मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. तसेच गेल्या २४ तासात कोकण, गोव्यासह विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक पावसाची नोंद झाल्याची माहीती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -