घरमुंबईपावसाळा संपल्यावर विद्यार्थ्यांना रेनकोट !

पावसाळा संपल्यावर विद्यार्थ्यांना रेनकोट !

Subscribe

पालिकेचे वरातीमागून घोडे

पावसाळा संपल्यानंतर उल्हासनगर मनपाच्या शाळेतील विद्यार्थ्यांना रेनकोट मिळतील असे नियोजन शून्य काम मनपाचे शिक्षण मंडळ करीत आहेत. सध्या रेनकोटसाठी निविदा प्रक्रिया सुरू असून प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या हातात हिवाळ्यात रेनकोट मिळणार आहेत. शिक्षण मंडळाच्या या धोरणावर नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या मनोज शेलार यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
उल्हासनगर महापालिकेच्या शिक्षण मंडळाने मागील आठवड्यात या विषयाची निविदा काढली आहे. या निविदेत 5 हजार 314 विद्यार्थ्यांना रेनकोट वाटप करण्याची तरतूद आहे. या निविदेचा पहिला लिफाफा 5 ऑगस्ट रोजी उघडला जाणार आहे.या निविदेतील इयत्तेनुसार वेगवेगळ्या मापाप्रमाणे रेनकोट खरेदी करण्यात येणार आहेत. याबाबत साई पक्षाच्या नगरसेविका ज्योती चैनानी यांनी पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांना पत्र देऊन थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा करायच्या शासनाच्या अध्यादेशाची आठवण करून दिली आहे.

हा शासनाचा आदेश तीन वर्षे जुना असून पालिका प्रशासन या आदेशाचे का पालन करीत नाही? असा प्रश्न चैनानी यांनी विचारला आहे. सोशल मिडियावर समाजसेवक प्रकाश तलरेजा यांनी दिलेल्या माहितीत शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये अवघे 3100 विद्यार्थी आहेत, असे असताना 5314 विद्यार्थ्यांसाठी निविदा का काढली आहे, असा प्रश्न उपस्थित केला आहे. विशेष म्हणजे ही निविदा 25 जुलैला प्रसिद्ध झाली असून रेनकोटचे नमुने हे 26 जुलैपर्यंत पर्यंत ठेकेदारांना जमा करण्याची अट टाकण्यात आली आहे.

- Advertisement -

रेनकोट दोन वर्षात एकदा वाटण्यात येतात. याबाबतची निविदा उशिरा निघाली आहे. ही चूक आहे. या निविदेच्या अटी शर्तींबाबत माहिती घेण्यात येईल.
– सुधाकर देशमुख, आयुक्त, उल्हासनगर महापालिका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -