घरमुंबईपावसाचा फटका प्राणी-पक्ष्यानांही बसला

पावसाचा फटका प्राणी-पक्ष्यानांही बसला

Subscribe

वादळी वारा, प्रचंड पाऊस पडला की पक्षांना हकनाक जीव गमवावा लागतो. अशाच प्रकारच्या घटनेमुळे शहरातील एकूण १७ पक्षांवर वेगवेगळ्या कारणांमुळे उपचार करण्यात आले आहेत.

सतत पडणाऱ्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मुक्या जीवांनाही फटका बसला आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे आपल्या घरट्यात राहणारे प्राणी पक्षी घरटं सोडून आडोशाच्या शोधात निघतात. पण, अनेकदा वादळी वारा, प्रचंड पाऊस पडला की पक्षांना हकनाक जीव गमवावा लागतो. अशाच प्रकारच्या घटनेमुळे शहरातील एकूण १७ पक्षांवर वेगवेगळ्या कारणांमुळे उपचार करण्यात आले आहेत.

अशा घटनेत खूप उंचावरुन जमिनीवर आदळलेल्या जखमी पक्षांवर पॉज म्हणजेच प्लान्ट अँड अॅनिमल्स वेल्फेअर या संस्थेतर्फे उपचार करण्यात येत असून त्यांना जीवनदान मिळायला मदत झाली आहे. पॉज या संस्थेतर्फे गेली अनेक वर्षे पशु-पक्ष्यांवर उपचार करत आहेत. गेले दोन दिवस पावसाचा जोर जास्त होता. त्यामुळे, झाड पडून घरटी पडण्याच्या घटनेतही वाढ झाली आहे. त्यात चिमण्या, कावळे, बगळे, रातबगळा, मुनिया अशा पक्षांचा समावेश आहे.

- Advertisement -

पावसाळा सुरू झाला की विजेचा आवाजाने पक्षी बिथरतात. पाळीव प्राण्यांना ऐकण्याची क्षमता मानवी क्षमतेपेक्षा चार पट जास्त असल्याने त्यांना कोणताही आवाज जोरात ऐकू येतो. त्यामुळे, कोणतेही प्राणी किंवा पक्षी हे घाबरतात. अग्निशमन दलाला पावसाळ्यात ९० टक्के कॉल्स हे फक्त जीव,जंतू,पशु,पक्षी यांच्या संबंधित येतात. त्यामुळे, पॉज ही संस्था प्राण्यांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून काम करत आहे.
– निलेश भणगे, संस्थापक, प्लान्ट अँड अॅनिमल्स वेल्फेअर सोसायटी

कुत्र्यांसाठी मॅजिक कॉलरची सुविधा

पावसात अनेकदा भरधाव वेगात गाड्या चालवत असताना रस्त्यांवर वावरत असलेल्या भटक्या कुत्र्यांना अपघाताचा सामना करावा लागतो. त्यामुळे पॉज या संस्थेतर्फे गेल्या तीन वर्षांपासून मॅजिक कॉलर बेल्ट (मानेचा पट्टा) बांधण्यात आला आहे. या पट्ट्याला रेडियम असल्यामुळे हे पट्टे रात्रीच्या वेळेस गाडीच्या प्रकाशात चमकतात. त्यामुळे, भटक्या कुत्र्यांना होणाऱ्यावर अपघातावर नियंत्रण मिळतं. २० जूनपासून आतापर्यंत ५० कुत्र्यांच्या मानेला पट्टे बांधण्यात आले असल्याचं पॉज संस्थेचे संस्थापक निलेश भणगे यांनी सांगितलं आहे.

- Advertisement -

मे महिन्यापासून पक्षांचा प्रजनन काळ सुरू होता. ते या काळात संगोपन करत असतात. अशा परिस्थितीत पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे त्यांची घरटी जमिनीवर कोसळतात. त्यात त्यांची पिल्लेही असतात. पिल्लं जमिनीवर आदळून त्यांना गंभीर दुखापत झाल्यास त्यांच्यावर उपचार केले जातात. नंतर त्यांना परळ किंवा ठाण्याच्या पशुवैद्यकीय हॉस्पिटलमध्ये सोडण्यात येतं, असंही भणगे यांनी स्पष्ट केलं आहे.

हेही वाचा –

‘..तर ‘मनसे स्टाईल’ आंदोलन करू’ – अमित ठाकरेंनी दिला अल्टिमेटम

नितेश राणेंसह १९ जणांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -