Sunday, September 19, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी माझा पती निर्दोष आहे- शिल्पा शेट्टी

माझा पती निर्दोष आहे- शिल्पा शेट्टी

लंडनमधून पॉर्न व्हिडिओ अपलोड करत होते. मात्र यासगळ्याशी राज कुंद्राचा काहीही संबंध नाही

Related Story

- Advertisement -

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा ( Shilpa Shetty)  पती राज कुंद्राला (Raj kundra)  पॉर्न व्हिडिओ प्रकरणी अटक केल्यानंतर अभिनेत्री शिल्पा शेट्टीची देखील कसून चौकशी करण्यात आली. राज कुंद्रा सध्या पोलिसांच्या ताब्यात असून त्याला २७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. शुक्रवारी उशिरा मुंबई क्राइम ब्रांचने राज कुंद्राच्या जुहू येथील बंगल्यावर धाड टाकली. त्यावेळी शिल्पाची कसून चौकशी करण्यात आलीय. मिड डेने दिलेल्या वृत्तानुसार, शिल्पाने चौकशीदरम्यान पॉर्न व्हिडिओ बनवण्याशी माझा नवरा राज कुंद्रा याचा काहीही संबंध नाही, माझा पती निर्दोष आहे, असे स्पष्टपणे सांगितले.  (Raj kundra is innocent not involved in making porn video – Shilpa Shetty) पुढे शिल्पाने असे देखील म्हटले की, माझा पती राज कुंद्रा ज्या व्हिडिओसाठी काम करत होता ते व्हिडिओ एरोटिक व्हिडिओ होते. एरोटिक व्हिडिओ पॉर्न व्हिडिओ नसतात.  शिल्पाच्या या वक्तव्यानंतर या प्रकरणी मोठी खळबळ उडाली आहे.

पॉर्न व्हिडिओ प्रकरण बाहेर आल्यानंतर राज कुंद्राच्या अडचणीत आणखी वाढ झाली. या प्रकरणानंतर पत्नी शिल्पा शेट्टी हिने राज कुंद्राचे समर्थन केले आहे. माझा पती निर्दोश आहे असे म्हणत लंडनमधील वॉन्टेड आरोपी आणि राज कुंद्राचे मेहूणे प्रदीप बक्षी हे पॉर्नग्राफी आणि त्याच्याशी संबंधीत अँपसोबत काम करत होते. ते लंडनमधून पॉर्न व्हिडिओ अपलोड करत होते. मात्र यासगळ्याशी राज कुंद्राचा काहीही संबंध नाही असे शिल्पाने वारंवार नमूद केले आहे.

राज कुंद्राच्या अडचणीत वाढ

- Advertisement -

राज कुंद्राचे अंधेरी येथील ऑफिस क्राइम ब्रांचकडून सील करण्यात आले असून त्याची झडती घेण्यात आली. या तपासात त्यांना एक गुप्त कपाट सापडले. त्या कपाटता काही बॉक्स फाईल ठेवण्यात आल्या होत्या. या फाईल्समध्ये क्रिप्टो करन्सीची माहिती होती. राज कुंद्रा पॉर्न व्हिडिओसोबत क्रिप्टो करन्सीद्वारे पैशांचे व्यवहार करत असल्याची शक्यता वर्तवण्यात आली असून प्रॉपर्टी सेलकडून याचा संपूर्ण तपास करण्यात येत आहे. पॉर्न फिल्ममधून राज कुंद्राला मिळालेले पैसे केंरीन नावाच्या कंपनीला पाठवले जायचे त्यानंतर केंरीन कंपनीकडून एका वेगळ्या मार्गाने राज कुंद्राला ते पैसे परत मिळायचे अशी माहिती समोर येत आहे.


हेही वाचा – Bigg Boss OTT : ‘बिग बॉस’ शोचा होस्ट आता सलमान खान नाही तर करण जोहर

- Advertisement -