घरमुंबईप्रजासत्ताक दिन: 'स्वतंत्रते न बघवते', राज ठाकरेंची मोदींवर व्यंगचित्रातून टीका!

प्रजासत्ताक दिन: ‘स्वतंत्रते न बघवते’, राज ठाकरेंची मोदींवर व्यंगचित्रातून टीका!

Subscribe

राज ठाकरे यांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीमध्ये व्यंगचित्र काढून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्यावर तीक्ष्ण शब्दांमध्ये टीका केली आहे.

आपल्या व्यंगचित्राच्या माध्यमातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे अनेकवेळा राजकीय परिस्थितीवर किंवा सत्ताधारी अथवा विरोधकांवर देखील शरसंधान साधताना दिसतात. आज ७०व्या प्रतासत्ताक दिनाच्या निमित्ताने राज ठाकरेंनी त्यांच्या व्यंगचित्रातून सध्याचे सत्ताधारी भाजप सरकारचे प्रमुख पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय प्रजासत्ताकला फाशी देत असताना भाजपचे अध्यक्ष अमित शाह त्यांच्या पाठिशी राहून त्यांना बळ देत आहेत, असे या व्यंगचित्रामध्ये दाखवण्यात आले आहे. त्यामुळे ऐन प्रजासत्ताकाच्याच दिवशी राज ठाकरेंचे हे व्यंगचित्र सत्ताधारी भाजपच्या वर्मी लागण्याची शक्यता आहे.

Raj Thackeray Cartoon
राज ठाकरे यांचे व्यंगचित्र
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -