घरताज्या घडामोडीराज ठाकरे म्हणतात...'या' वावटळीत पण इरफान इथे टिकून राहिला

राज ठाकरे म्हणतात…’या’ वावटळीत पण इरफान इथे टिकून राहिला

Subscribe

फक्त बॉलिवूडच नाही तर हॉलिवूड आणि इतरही काही भाषांमध्ये आपल्या अभिनयाची वेगळी ओळख निर्माण करणारे अभिनेते इरफान खान यांचे आज निधन झाले. या घटनेनंतर बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील इरफान खान यांच्यावर एक भावनिक पोस्ट केली आहे.

- Advertisement -

राज ठाकरे म्हणतात की, ‘शरीर सौष्ठव, चकचकीत चेहरा, नृत्याचं अंग नसलं तरी पडद्यावर जे अंगविक्षेप केले जातील त्याला नृत्य म्हणणं आणि अतर्क्य दिसणाऱ्या, वागणाऱ्या खलनायकांना संपवण्यासाठी अतर्क्य गोष्टी करणाऱ्या बॉलिवूड मधल्या नायकांचा काळ सुरु असताना इरफान खान सिनेमात भूमिका मिळाव्यात म्हणून धडपडत होता. त्याची अभिनयाची सहज-सुलभता नसिरुद्दीन शाह, ओम पुरी आणि अजून मागे गेलं तर बलराज सहानी यांच्या पठडीतली. पण, ९० च्या दशकात मुळात हिंदी चित्रपट आणि अभिनय यांच्यात फारकत असण्याचा काळ होता. मात्र, असे असताना देखील या वावटळीत पण इरफान इथे टिकून राहिला.

आणि इरफानची ‘मकबूलीयत’ सुरु झाली

राज ठाकरे म्हणतात की, अभिनयातील एकरूपताच इरफानला दीर्घकाळ स्मरणात ठेवेल. तसेच ते ‘पुढे म्हणाले की ‘नव्या शतकात सिनेमातले अतर्क्य खलनायक मागे पडले आणि माणसातील उणिवा, महत्त्वाकांक्षा, याही माफक का होईना खलनायकी असू शकतात याची जाणीव नव्या दिग्दर्शकांना होत होती. त्यातून इरफानची ‘मकबूलीयत’ सुरु झाली. हिंदी चित्रपटसृष्टीच्या साचेबद्ध यशस्वी नटांच्या पठडीतलं आपल्याकडे काही नव्हतं याची जाणीव इरफानला असावी आणि त्याची उणीव त्याने संवाद फेकीने, डोळ्यातून व्यक्त होण्याच्या ताकदीने भरून काढली. एखादे किडकिडीत व्यक्तिमत्व पण, पडदा व्यापून टाकू शकतं. हे इरफानने दाखवून दिलं. सहज अभिनयाची परंपरा हिंदी चित्रपटसृष्टीत इरफानने प्रवाहित ठेवली.

- Advertisement -

आणि हेच 0इरफानना भावलं

राज ठाकरे म्हणतात की, ‘इरफान लक्षात राहील कारण पडद्यावर तो वावरताना आपल्यातला प्रत्येक माणूस स्वतःला त्याच्याशी एकरूप करू शकायचा. ही एकरूपताच इरफानला दीर्घकाळ स्मरणात ठेवेल. माझ्या पक्षाची चित्रपट शाखा कलाकारांसाठी प्रामाणिकपणे काम करते, हेच इरफानना भावलं असणार आणि म्हणून त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचा सदस्यत्व स्वीकारलं असणार. अशा या चतुरस्त्र अभिनेत्यास आणि सहकाऱ्यास भावपूर्ण श्रद्धांजली’.


हेही वाचा – इरफान खानचे स्वप्न राहिले अधुरे, वाचा कोणते?


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -