घरमुंबईभाजपच्या या पराभवासाठी गुजराती जनतेचे आभार - राज ठाकरे

भाजपच्या या पराभवासाठी गुजराती जनतेचे आभार – राज ठाकरे

Subscribe

राज ठाकरे यांनी पाच राज्यांमधल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.

मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातलं देखील राजकीय वातावरण तापू लागलं आहे. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये भाजपला काँग्रेसनं घाम फोडल्यामुळे आगामी लोकसभा निवडणुका वाटतात तितक्या सोप्या नसणार आहेत, हा संदेश भाजपला मिळाला आहे. त्याच पार्श्वभूमीवर या निवडणुकांचे निकाल स्पष्ट होत असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दादरला कृष्णकुंज या त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली.

गुजरातने पायंडा पाडला

निवडणुकांमध्ये मतदान करणाऱ्या जनतेचे यावेळी राज ठाकरेंनी आभार मानले. मात्र, या सगळ्याची सुरुवात गुजराती जनतेने केल्याचं ते म्हणाले. ‘यासाठी मी आधी गुजराती जनतेचे आभार मानेन. भाजपला नाकारण्याचा पायंडा गुजराती जनतेने पाडला. मोदींना त्यांची जागा दाखवून देण्याचं काम गुजरातच्या जनतेनं केलं. २०१४च्या निवडणुकांमध्ये भाजपला मिळालेली मतं पाहाता २०१७मध्ये गुजरात विधानसभेत भाजपला १६५ जागा मिळायला हव्या होत्या. त्या ९९पर्यंत आणण्याचं काम गुजरातच्या जनतेनं केलं. नंतर कर्नाटकमध्ये देखील तेच चित्र आपल्याला दिसलं’, असं राज ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

येणाऱ्या लोकसभा निवडणुकांची ही नांदी

भाजपला या निवडणुकांमध्ये बसलेला फटका ही येणाऱ्या लोकसभा निवडणुकांची नांदी असल्याचं यावेळी राज ठाकरे म्हणाले. ‘ही नाराजी स्थानिक नसून देशभरातल्या जनतेची नाराजी आहे. त्याचेच परिणाम या निवडणुकांमध्ये दिसले आहेत. राम मंदिराच्या मुद्द्यावर एवढं सुरू आहे, पण देशाला राम मंदिराची नसून राम राज्याची गरज आहे. यांना राम मंदिर हवंय, कारण त्यांनी दुसरं काही केलेलंच नाहीये. त्यामुळे भावनिक सगळं सुरू आहे. पण यांच्या भावनांना भुलून आता भारतीय जनता यांना मतदान करेल, असं मला वाटत नाही’, असं राज ठाकरे यावेळी बोलताना म्हणाले.

राहुल गांधींचं केलं कौतुक

दरम्यान, यावेळी बोलताना राज ठाकरेंनी चक्क काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांघी यांचं कौतुक केलं. ‘राहुल गांधी निवडणुकांमध्ये एकटेच होते. आताही ते एकटेच होते आणि कर्नाटकमध्ये देखील एकटेच होते. त्यामुळे आता पप्पूचा परमपूज्य झाला आहे. राहुल गांधींच्या नेतृत्वाला जनतेनं दिलेला हा कौल आहे’, असं राज ठाकरेंनी सांगितलं.

- Advertisement -

काही दिवसांनी उर्जित पटेल बोलतील

दरम्यान, यावेळी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी दिलेल्या राजीनाम्याच्या मुद्द्यावरून देखील राज ठाकरेंनी मोदी सरकारवर निशाणा साधला. ‘कुठल्यातरी धोक्याची जाणीन धाल्यामुळेच त्यांनी राजीनामा दिला. तेही काही दिवसांनी त्यावर बोलतील. आता या देशातल्या लोकांनी किती थापा ऐकायच्या?’ असं राज ठाकरे म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -