घरCORONA UPDATEकोरोनाची कृष्णकुंजवर पुन्हा एन्ट्री, 'या' व्यक्तीची टेस्ट आली पॉझिटिव्ह!

कोरोनाची कृष्णकुंजवर पुन्हा एन्ट्री, ‘या’ व्यक्तीची टेस्ट आली पॉझिटिव्ह!

Subscribe

या आधी सुध्दा कोरोनाने कुष्णकुंजवर एन्ट्री घेतली होती.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे निवासस्थान असलेले कृष्णकुंजवर पुन्हा एकदा कोरोनानं धडक दिली आहे. काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांच्या सुरक्षा रक्षकांपैकी तीन जणांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं होती. आता राज ठाकरे यांच्या दोन्ही वाहनचालकांना कोरोनाची लागण झाली आहे आहे. या दोघांनाही उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

तर या आधी सुध्दा कोरोनाने कुष्णकुंजवर एन्ट्री घेतली होती. राज ठाकरे यांच्या सुरक्षा रक्षकांच्या ताफ्यातील तीन पोलिस कर्मचाऱ्यांना करोनाचा संसर्ग झाला होता. मात्र, हे तिन्ही पोलिस करोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. नुकतंच या सुरक्षा रक्षकांनी करोनावर यशस्वी मात करत करोनाविरुद्धची लढाई जिंकली आहे. आता राज ठाकरे यांच्या वाहनचालकाला कोरोनाची लागण झाल्यामुळे पुन्हा एकदा चिंतेत वाढ झाली आहे.

- Advertisement -

हे ही वाचा – भारत – चीनी सैनिकांमधील संघर्षाचा ‘तो’ व्हिडीओ आला समोर!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -