घरताज्या घडामोडी'कोरोनामुळे आपल्याला भेटता आलं नाही, पण लवकरच भेटू'

‘कोरोनामुळे आपल्याला भेटता आलं नाही, पण लवकरच भेटू’

Subscribe

यंदा कोरोनामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांची भेट झाली नाही पण, लवकरच भेटू, असा विश्वास मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.

९ मार्च म्हणजेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापन दिन. आज मनसेला तब्बल १५ वर्ष पूर्ण झाली. दरवर्षी दादरच्या शिवाजी पार्कमध्ये हजारोंच्या मनसैनिकांच्या उपस्थित हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडतो. मात्र, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मनसेचा १५वा वर्धापन दिन रद्द करण्यात आला. परंतु, अवघ्या काही कार्यकर्त्यांच्या उपस्थित हा सोहळा अगदी साधेपणाने पार पडला. दरम्यान, राज ठाकरे यांनी मनसैनिकांसह कार्यकर्त्यांना न विसरता आपल्या बुलंद आवाजात त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यात ते म्हणाले…’आपल्याला कोरोनामुळे भेटता आले नाही, पण लवकरच भेटू’,असा विश्वास राज ठाकरेंनी मनसैनिकांना दिला.

काय म्हणाले राज ठाकरे?

‘कोरोनाच्या सध्याच्या परिस्थितीमुळे हा पहिलाच वर्धापन दिन आहे. जेव्हा आपण भेटू शकत नाही. मला कल्पना आहे. तुम्ही मला भेटायला आतुर असाल मी ही आहे. पण, सध्याची परिस्थिती पाहता गर्दी टाळण आवश्यक आहे, हे तुम्हीही मान्य कराल. तुम्हाला समोर पाहता येणार नाही. प्रत्यक्ष भेटता येणार नाही. म्हणूनच हा रेकोर्डेड संदेशाचा मार्ग स्विकारला. पण, ही परिस्थिती निवळली की आपण भेटणार आहोत हे नक्की. तेही मोठ्या संख्येने. तोपर्यंत स्वत:ची, कुटुंबाची आणि नागरिकांची काळजी घ्या’, असे ही सांगण्यात आले.

- Advertisement -

आणि मनातील शंका दूर झाली

‘आज आपल्या पक्षाचा १५वा वर्धापन दिन त्याबद्दल तुम्हाला सर्वांना वर्धापन दिनाच्या मनापासून शुभेच्छा. बघता बघता सर्वांनी एकत्र पाहिलेल्या स्वप्नाला आज १५वर्ष पूर्ण झाली. १५वर्षापूर्वी जेव्हा आपण महाराष्ट्र सेनेची स्थापना केली. तेव्हा खरच सांगतो मनात एक धाकधूक होती. मी महाराष्ट्रासाठी नवे, असे काहीतरी करायला निघालो होतो. पण, लोक मला कसं स्विकारतील अशी मनात धाकधूक होती. पण, १९ मार्च २००६ च्या पक्ष स्थापनेनंतरच्या शिवतीर्थावरच्या सभेत मी व्यासपिठावर पाऊल ठेवल आणि समोर पसरलेला अलोट जनसमूदाय पाहिला आणि मनातील शंका दूर झाली’.

Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -