घरताज्या घडामोडीमार्डच्या डॉक्टरांचा विषय राज साहेब आरोग्यमंत्र्यांकडे मांडतील - बाळा नांदगावकर

मार्डच्या डॉक्टरांचा विषय राज साहेब आरोग्यमंत्र्यांकडे मांडतील – बाळा नांदगावकर

Subscribe

मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर उपोषण करण्याचा इशारा

कोरोनाच्या परिस्थिती डॉक्टर आपला जीव धोक्यात घालून रुग्णांची सेवा करत आहे. मात्र त्याच्या वेतनात वाढ केलेली नाही. त्याचबरोबर डॉक्टरांच्या विद्यावेतनावर टिडीएस कापला जात आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या सायन,नायर,केईएम आणि कुपर रुग्णालयातील मार्डच्या डॉक्टरांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंजवर भेट घेत डॉक्टरांच्या वेगवेगळ्या मागण्यांबाबत मध्यस्ती करण्याची मागणी करण्यात आली. कोरोना काळात जास्त काम करुनही वेतनवाढ केली जात नाही. त्याचबरोबर महापालिकेने मार्जच्या डॉक्टरांच्या विद्यावेतनामधून टिडीएस कापू नये अशी मागणी यावेळी मार्डच्या डॉक्टरांकडून करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची भेट घेणार आहे. त्याच्यांसमोर मार्डच्या डॉक्टरांच्या सर्व मागण्या मांडणार असल्याचे मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितले आहे.

राज्यातील इतर डॉक्टरांचा टिडीएस कापला जात नाही. मग महापालिका मार्डच्या डॉक्टरांच्या विद्यावेतनातील टिडीएस का कापत आहे, असा प्रकार प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत केला तर चालेल का?,असा सवाल यावेळी बाळा नांदगावकर यांनी केला. राज ठाकरे लवकरचं याविषयी आरोग्यमंत्री राजेश टोपे त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांशी बोलून हा विषय त्यांच्यासमोर मांडणार असल्याचे बाळा नांदगावकर यांनी सांगितले.

- Advertisement -

मार्डचे डॉक्टरांनी राज ठाकरे यांची भेट घेतील असता या संदर्भात तुम्हाला न्याय मिळेल असे आश्वासन राज ठाकरे यांनी दिल्याचे मार्डच्या डॉक्टरांनी सांगितले. गेल्या दोन दिवसांपासून आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून आंदोलन करत आहोत. रुग्णांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेत आहोत असेही ते म्हणाले. कोरोना काळात मार्डचे डॉक्टर जीव धोक्यात घालून काम करत आहे. जास्त काम करुनही आम्हाचे वेतन वाढवत नाहीत. उलट आमच्या विद्यावेतनावर टिडीएस लावला जात आहे. गेली एक वर्ष शिक्षण बंद असूनही आमच्याकडून संपूर्ण फि घेतली जात आहे. येणाऱ्या काळाच आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर आम्ही उपोषण करु असा इशारा मार्डच्या डॉक्टरांकडून देण्यात आला आहे.


हेही वाचा – UPA अध्यक्षाबद्दल एकत्र बसून ठरवले पाहिजे, फडणवीसांच्या आरोपांना मोदींनी उत्तर दिलं – संजय राऊत

- Advertisement -

 

 

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -