घरमुंबईराज ठाकरेंवर उद्या होणार शस्त्रक्रिया

राज ठाकरेंवर उद्या होणार शस्त्रक्रिया

Subscribe
पायाचे दुखणे वाढल्यामुळे राज ठाकरे (Raj Thackeray) 31 मे रोजी लीलावती रुग्णालयात (Lilavati Hospital) दाखल होण्याची शक्यता आहे. रुग्णालयात त्यांच्यावर शस्त्रकियेपूर्वी चाचण्या केल्या जाण्याची शक्यता आहे.  1 जून रोजी त्यांच्या पायावर शस्त्रक्रिया होण्याची शक्याता आहे.
राज ठाकरेंनी पुण्यात दिली होती शस्त्रक्रियेची माहिती – 
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची पुण्यात एका सभागृहात सभा झाली होती. यावेळी त्यांनी पायाच्या दुखन्या विषयी माहिती दिली होती. ते म्हणाले थोडेसे माझे पायाचे दुखणे सुरू आहे. पायामुळे कंबरेला मला त्रास होते. दोन दिवस पुण्यात येथे काही नव्हते म्हणून  मी मुंबईला गेलो. मला फिजीओ बीजीओ जरा काही करायचे होते. त्या  दरम्यान मी डॉक्टरांशी बोलून घेतले. पण ते जरा प्रकरण थोडेसे वाढले असल्यामुळे येत्या 1 तारखेला शस्त्रक्रिया करतोय. ती शस्त्रक्रिया माझ्या हीप बोनची शस्त्रक्रिया (hip bone surgery) आहे. हे का सांगीतले तुम्हाला कारण कोणालाही न सांगता शस्त्रक्रिया गेलो तर पत्रकार बांधव कुठचा कुठचा आवयव  बाहेर काढतात ते काही कळतच नाही.  मी म्हटले बाकीच्या गोष्टींची ओढातान करण्या पेक्षा आपणच सांगू कशाची आहे शस्त्रक्रिया…, अशी माहिती राज ठाकरे यांनी दिली होती.
अयोध्या दौरा रद्द – 
मशिदीवरील भोंग्यांना विरोध आणि अयोध्या दौऱ्यामुळे राज ठाकरे (Raj Thackeray)चर्चेत आले होते. मात्र, भाजप खासदाराने राज यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध केला होता. उत्तर प्रदेशमध्ये यायचे असेल तर अगोदर उत्तर भारतीयांची माफी मागा अशी मागणी भाजप खासदाराने केली होती. त्यानंतर माझा दौरा अयशस्वी होण्यासाठी महाराष्ट्रातून रसद पुरवली गेली, असा आरोप राज ठाकरे यांनी  केला होता.

 

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -