घरताज्या घडामोडीमनसेची शॅडो कॅबिनेट ठरली; पण मर्जीतल्या नेत्यांनाच कॅबिनेटमध्ये संधी

मनसेची शॅडो कॅबिनेट ठरली; पण मर्जीतल्या नेत्यांनाच कॅबिनेटमध्ये संधी

Subscribe

नुकत्याच झालेल्या मनसेच्या महाअधिवेशनात पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या शॅडो कबिनेटची घोषणा केली होती. ही शॅडो कॅबिनेट नेमकी असणार तरी कशी? याची उत्सुकता सगळ्यांना लागली होती. मात्र आता उद्या (दि. ९ मार्च) म्हणजेच मनसेच्या वर्धापन दिनी मनसेची ही शॅडो कॅबिनेट जाहीर होणार असून, या शॅडो कॅबिनेटमध्ये २८ जणांचा समावेश करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यात बाळा नांदगावकर, संदिप देशपांडे, अभिजित पानसे, नितीन सरदेसाई आणि अमेय खोपकर यांचा समावेश असण्याची शक्यता आहे. कृष्णकुंजवर आज मनसे नेते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. त्यामध्ये जवळपास अडीच तास शॅडो कॅबिनेटवर चर्चा झाल्याची माहिती मिळतेय.

शॅडो कॅबिनेटमधील संभाव्य मंत्री 

1 – बाळा नांदगावकर, गृहमंत्री

- Advertisement -

2 – संदीप देशपांडे, नगरविकास

3 – नितीन सरदेसाई, अर्थ

- Advertisement -

4 – राजू उबरकर, कृषी

5 – रिटा गुप्ता, महिला बाल कल्याण

6 – किशोर शिंदे, कायदा सुव्यवस्था

7 – अमेय खोपकर, सांस्कृतिक मंत्री

8 – अभिजित पानसे, शालेय शिक्षण

9 – गजानन काळे, कामगार

10 – योगेश परुळेकर, सार्वजनिक बांधकाम मंत्री

 

शॅडो कॅबिनेटमध्ये मर्जीतल्यांनाचा स्थान

दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शॅडो कॅबिनेटमध्ये पुन्हा एकदा स्वत:च्या मर्जीत असणाऱ्या नेत्यांना स्थान दिले असून, यामध्ये मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे, अमेय खोपकर आणि अभिजीत पानसे या मर्जीतल्या नेत्यांनाच स्थान दिल्याचे समजते. विशेष म्हणजे हे ठराविक नेते बाकी कार्यकर्त्यांना फारसे स्थान मिळत नसल्याने मनसेमध्ये आता अंतर्गत धुसफूस सुरू झाली आहे. विशेष बाब म्हणजे काही मनसेच्या कार्यकर्त्यांशी आणि नेत्यांशी खासगीत बोलले असता त्यांनी या शॅडो कॅबिनेटमध्ये फक्त मर्जीतलेच लोक दिसत असल्याचे सांगत अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केली. दरम्यान शॅडो कॅबिनेटमधील प्रत्येक नेत्यावर संबंधित खात्याच्या कामावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी देण्यात येणार आहे. तसेच शॅडो कॅबिनेटमधील हे नेते एखाद्या मंत्र्याने गैरव्यवहार केला, तर त्याचा पाठपुरावा करणार आहेत.

शॅडो कॅबिनेट म्हणजे काय?

सरकारमध्ये विरोधी पक्षाला अतिशय महत्त्व दिले जाते. तसेच तो पक्ष सरकारच्या प्रत्येक नेत्याच्या हालचालींवर नजर ठेवतो आणि त्याच विरोधी पक्षाच्या कॅबिनेटला ‘शॅडो कॅबिनेट’ म्हटले जाते. कॅबिनेटमध्ये प्रथम श्रेणीचे १५ ते २० मंत्री असतात. राज्यमंत्री, उपमंत्री यांचा कॅबिनेटमध्ये समावेश नसतो. तर काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्या महाविकास आघाडी सरकारच्या कॅबिनेटमध्ये मात्र, ३३ मंत्र्यांचा समावेश आहे. त्यामुळे मनसेच्या प्रत्येक नेत्याकडे दोन-दोन मंत्र्यांची जबाबदारी दिली जाण्याची चिन्हे आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -