घरमुंबईराज ठाकरेंच्या सुरक्षेत वाढ, इतक्या पोलिसांचा असणार फौजफाटा

राज ठाकरेंच्या सुरक्षेत वाढ, इतक्या पोलिसांचा असणार फौजफाटा

Subscribe

राज ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर मनसे अध्यक्ष्य राज ठाकरेंच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेत धमकीचे पत्र मिळाल्याची माहिती दिली होती. त्यानंतर राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना वाय प्लस दर्जाची सुरक्षा आहे. राज्य सरकारने त्यांची वाय प्लस दर्जाची सुरक्षा कायम ठेवली आहे. मात्र, पोलिसांच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी एक अतिरिक्त पोलीस अधिकारी आणि अंमलदार तैनात करण्यात आला आहे.

- Advertisement -

राज्य सरकार थट्टा करतेय का?- बाळा नांदगावकर

मी राज्याच्या गृहमंत्र्यांना काही दोष देणार नाही. राज्य सरकारने निर्णय घ्यायला हवा. राज्य सरकारची एक समिती असते. ही समिती कुणाला किती सुरक्षा पुरवायची याबाबतचा निर्णय घेते. या समितीत मुख्यमंत्री आणि आणखी एक-दोन जण असतात. राज ठाकरे यांना आधी झेड सिक्युरिटी होती. ती कमी करून वाय करण्यात आली. मी गृहमंत्र्यांना भेटून पुन्हा झेड दर्जाची सुरक्षा देण्याची विनंती केली होती, पण मी जेव्हा राज ठाकरेंच्या घरी गेलो तेव्हा एक इन्स्पेक्टर आणि एक पोलीस दिला आहे. मग कशाला सुरक्षा देताय? थट्टा सुरू आहे का? त्यापेक्षा सुरक्षा देऊच नका, असा संताप मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

राज ठाकरेंना धमकीचे पत्र 

बाळा नांदगावकर यांनी राज ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी मिळाली असल्याची माहिती बुधवारी दिली होती. या पत्रात अजानबाबात जे करत आहात ते बंद करा, अन्यथा तुम्हाला ठार करु. तुम्हाला तर सोडणार नाहीच पण राज ठाकरेंनाही मारुन टाकू, असे लिहिले असल्याची माहिती बाळा नांदगावकरांनी दिली होती. हे हिंदी पत्र असून त्यात उर्दू शब्दही आहेत असे बाळा नांदगावकरांनी सांगितले होते. यावेळी राज ठाकरेंच्या केसाला जरी धक्का लागला तर महाराष्ट्र पेटेल असा इशारा बाळा नांदगावकर यांनी दिला होता.

राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध 

राज ठाकरेंनी 5 जूनला अयोध्येत जाण्याचं जाहीर केले आहे. मनसेने या दौऱ्याची जोरदार तयारी सुरु केली आहे. मात्र, उत्तर भारतीयांची माफी मागितल्याशिवाय राज ठाकरेंना अयोध्येत पाऊल ठेवू देणार नाही असे भाजपचे उत्तर प्रदेशमधील खासदार  बृजभूषण सिंह म्हटले होते. खासदार बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरे यांच्या दौऱ्याला विरोध दर्शवत स्थानिक साधूसंत आणि महंतांच्या उपस्थितीत रॅली काढली होती.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -