अन शर्मिला वहिनींनी राज ठाकरेंचे भाषण जमिनिवर बसून ऐकलं!

sharmila thackeray seat in public in mns morcha
शर्मिला वहिनी खाली बसून भाषण ऐकत होत्या.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आज पाकिस्तान आणि बांगलादेशी घुसखोरांविरोधात मुंबईमध्ये मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चाला मोठ्या संख्येने मनसैनिकांनी हजेरी लावली होती. मात्र राज ठाकरे यांच्या भाषणा दरम्यान सगळ्यांचे लक्ष वेधले ते राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी. त्याचे कारण म्हणजे राज ठाकरे यांचे भाषण शर्मिला वहिनीनी चक्क जमिनीवर बसून ऐकले. राज ठाकरे यांचे भाषण सुरू होण्याआधी सर्व पदाधिकाऱ्यांनी भारतीय आसन पद्धतीने बसावे जेणेकरून सर्वांना राज ठाकरे यांचे भाषण नीट बघता आणि ऐकता येईल अशा सूचना देण्यात आल्या. त्या सूचनेचे पालन शर्मिला ठाकरे यांनी देखील जमिनीवर बसत संपुर्ण भाषण ऐकले.

सासूबाईसोबत सुनबाईही बसल्या जमिनीवर

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शर्मिला यांच्यासोबत त्यांच्या सुनबाई म्हणजेच अमित ठाकरे यांच्या पत्नी देखील आपल्या सासऱ्यांचे भाषण ऐकण्यासाठी जमिनीवर बसल्या. एवढेच नाही तर राज ठाकरे यांच्या कन्या उर्वशी ठाकरे या देखील बाबांचे भाषण ऐकण्यासाठी जमिनीवर बसल्याचे पहायला मिळाले. दरम्यान मनसे नेतेपदी नियुक्ती झाल्यानंतर अमित ठाकरे मात्र आता भाषणा दरम्यान स्टेजवर पाहायला मिळाले. राजकारणात येण्या अगोदर अमित ठाकरे हे राज ठाकरे यांचे भाषण कार्यकर्त्यांसोबत आणि पदाधिकाऱ्यांसोबत स्टेजच्या खाली बसून ऐकायचे.

राज ठाकरे यांनी आपल्या २२ मिनिटांच्या भाषणात पाकिस्तान आणि बांगलादेशातील घुसखोरांना चांगलाच इशारा दिला. तसेच CAA आणि NRC वरुन देशात मोर्चे काढणाऱ्या मुस्लिम समुदायांना देखील फटकारले. भारत देश धर्मशाळा नाही, कुणीही यावे आणि इथे राहावे. केंद्र सरकारने आर्थिम मंदीवरुन लक्ष हटविण्यासाठी केवळ या कायद्यांचा फार्स करु नये, तर या कायद्यांची कडक अंमलबजावणी करावी, असेही राज ठाकरे म्हणाले.