घरमुंबईब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा विषाणू, मुंबईत आरोग्यमंत्री म्हणतात...

ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा विषाणू, मुंबईत आरोग्यमंत्री म्हणतात…

Subscribe

‘ब्रिटन आणि युरोप मध्ये आलेल्या नव्या स्टेन व्हायरस बाबत गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्यात नव्या वर्षात नाईट कर्फ्यूसारख्या उपाययोजना करण्यात येत आहेत’, असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले. सरकारने घालून दिलेले नियम नागरिकांनी पाळावेत, असे आवाहन देखील राजेश टोपे यांनी केले आहे. ‌यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये ते पत्रकारांशी बोलत होते.

‘युरोपीय राष्ट्रांमध्ये लॉकडाऊन करण्यात आले असले तरी जनतेने घाबरून जाण्याची गरज नाही. उपलब्ध होत असलेली लस या नव्या स्टेनवरही लाभदायक असल्याचे दिसून येत आहे’, असा आशावाद टोपे यांनी यावेळी व्यक्त केला. ‘या विषाणूंवर राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्थेतही संशोधन सुरू आहे, त्याचा अहवाल ICMRला सादर केला जाईल. तोपर्यंत सरकारने केलेल्या नियमावली पाळावी लागेल’, असं ते म्हणाले.

- Advertisement -

‘राज्य सरकार लसीकरणाच्या दृष्टीने तयारीत आहे. सध्या १६ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. भारत बायोटेक, सीरम या संस्थेने केंद्राकडे परवानगी मागितली आहे. तसेच आंतरराष्ट्रीय ऑक्सफर्डही लस देण्याच्या तयारीत आहे. मात्र कोणती लस घ्यायची हा केंद्राचा निर्णय आहे. त्यांनी याबाबत त्वरीत निर्णय घेऊन राज्यांना सूचित करावे’, असे टोपे यांनी सुचविले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -