घरताज्या घडामोडीया 'तीन; नेत्यांमुळे आघाडीची बिघाडी होणार ? का ते वाचा

या ‘तीन; नेत्यांमुळे आघाडीची बिघाडी होणार ? का ते वाचा

Subscribe

. भाजपने राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड, काँग्रेसच्या यशोमती ठाकूर आणि शिवसेनेचे आमदार सुहास कांदे ) यांच्या मतदानावरआक्षेप घेतला आहे.

महाविकास आघाडी आणि भाजपने प्रतिष्ठेची केलेली राज्यसभेची सहा जागांसाठीची (Rajya Sabha Election 2022  News)निवडणुक आज पार पडली. पण अद्याप मतमोजणीलाच सुरूवात न झाल्याने सर्वच पक्ष अस्वस्थ झाले आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad), , काँग्रेसच्या यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) आणि शिवसेनेचे आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांच्या मतदानावर भाजपने आक्षेप घेतला आहे. यामुळे निवडणूक आयोगाने मतमोजणी रोखली आहे. परिणामी मतमोजणी नक्की केव्हा सुरू होणार हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

- Advertisement -

जितेंद्र आव्हाड यांनी मतदान केल्यानंतर राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांच्याकडे मतपत्रिका दिली तर यशोमती ठाकूर यांनीही नाना पटोलेंकडे मतपत्रिका दिली. नंतर सुहास कांदे यांनीही मतपत्रिका देताना हातचलाखी केली, शिवसेनेबरोबरच त्यांनी राष्ट्रवादीच्या प्रतिनिधीला मतपत्रिका दाखवली असा आरोप करत या तिघांचे मत बाद करण्याची मागणी भाजपने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे.

- Advertisement -

यामुळे सध्या निवडणूक आयोगाने याची शहानिशा करण्यासाठी मतमोजणीच रोखली आहे. दरम्यान, मतमोजणीचे व्हिडीओच निवडणूक आयोगाने मागवले आहेत. यामुळे मतमोजणी केव्हा होणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहीले आहे.

 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -