घरमुंबईसु‘रक्षा बंधन ’!

सु‘रक्षा बंधन ’!

Subscribe

मिठीबाईच्या विद्यार्थ्यांनी बांधल्या डॉक्टर, पोलिसांना राख्या

पोलीस, वाहतूक पोलीस, अग्निशमन दलाचे जवान, सीमेवरील सैन्य व डॉक्टर हे नागरिकांच्या सुरक्षा व सेवेसाठी सदैव तत्पर असतात. परंतु, त्यांची सुरक्षाही तितकीच महत्त्वाची असते. मिठीबाई कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी ‘सुरक्षाबंधन’ उपक्रमांर्तगत त्यांच्या सुरक्षेबाबत बुधवारी नागरिकांमध्ये जागरुकता केली. यावेळी विद्यार्थ्यांनी डॉक्टर व पोलिसांना राख्या बांधून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

मिठीबाई कॉलेजच्या ‘क्षितीज’ सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत रक्षाबंधननिमित्त ‘सुरक्षाबंधन’ हा उपक्रम राबवतात. मुंबईच्या विविध सरकारी हॉस्पिटलमधील डॉक्टर हे सदैव रुग्णांच्या सेवेसाठी कार्यरत असतात. परंतु, काही दिवसांपासून त्यांच्यावरील होणार्‍या हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. नागरिकांच्या सेवेसाठी 24 तास तत्पर असलेल्या डॉक्टरांवर अशा प्रकारे हल्ले होणे योग्य नसून, त्यांची सुरक्षा महत्त्वाची आहे. याची नागरिकांना जाणीव व्हावी यासाठी मिठीबाई कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी ‘सुरक्षाबंधन’ उपक्रमांतर्गत बुधवारी जे.जे. हॉस्पिटल व नायर हॉस्पिटलमधील डॉक्टर व कर्मचार्‍यांना राख्या बांधून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

- Advertisement -

त्याचप्रमाणे त्यांनी जुहू आणि विलेपार्ले येथील पोलीस ठाण्यातील पोलिसांना व अग्निशमन दलाच्या जवानांना राख्या बांधून नागरिकांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर असल्याबद्दल त्यांचे आभार मानले. पोलिस, वाहतूक पोलिस, अग्निशमन दलाच्या जवानांना प्रत्यक्ष भेटून विद्यार्थ्यांनी त्यांना राख्या बांधत कृतज्ञता व्यक्त केली. त्याचबरोबर त्यांनी कारगिल सीमेवर देशाच्या रक्षणार्थ तैनात असलेल्या जवानांना त्यांनी 150 राख्या पाठवल्या.

नागरिकांच्या सुरक्षेसाठी जवान नेहमीच आपल्या वैयक्तिक आयुष्याचा त्याग करतात. त्यांच्याप्रती ‘सुरक्षाबंधन’ उपक्रमातून विद्यार्थ्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. मिठीबाईच्या ‘क्षितीज’ टीमचे कार्य हे कौतुकास्पद आहे. – डॉ. राजपाल हांडे, प्राचार्य, मिठीबाई कॉलेज

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -