घरक्राइमराखी सावंतची सहा तासांच्या चौकशीनंतर पोलीस ठाण्यातून सुटका; नेमकं प्रकरण काय?

राखी सावंतची सहा तासांच्या चौकशीनंतर पोलीस ठाण्यातून सुटका; नेमकं प्रकरण काय?

Subscribe

मनोरंजन सृष्टीतील ड्रामा क्वीन अशी ओळख असलेली राखी सावंत गेले अनेक दिवस तिच्या लग्नाच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. अशातच आज अभिनेत्री राखी सावंतला आंबोली पोलिसांनी ताब्यात घेतले होते. एका अभिनेत्रीने राखी सावंत विरोधात तक्रार केली होती. त्यानंतर राखील आज पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

मनोरंजन सृष्टीतील ड्रामा क्वीन अशी ओळख असलेली राखी सावंत गेले अनेक दिवस तिच्या लग्नाच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. अशातच आज अभिनेत्री राखी सावंतला आंबोली पोलिसांनी ताब्यात घेतले होते. एका अभिनेत्रीने राखी सावंत विरोधात तक्रार केली होती. त्यानंतर राखील आज पोलिसांनी ताब्यात घेतले होते. याप्रकरणी आंबोली पोलिसांनी राखी सावंतची सहा तास चौकशी केली असून तीला सोडून दिले. त्यानंतर राखी सावंत आंबोली पोलीस स्टेशनमधून हात जोडून बाहेर निघाली. (rakhi sawant released from amboli police station after six hours of interrogation mumbai police)

मॉडेल आणि चित्रपट अभिनेत्री शर्लिन चोप्रा प्रकरणात चौकशी केल्यानंतर आंबोली पोलिसांनी तिला घरी जाण्याची परवानगी दिली आहे. राखी सावंतवर अनेक आरोप करत शर्लिन चोप्राने आंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. शर्लिन चोप्राच्या तक्रारीनंतर आंबोली पोलिसांनी राखी सावंतला आज दुपारी चौकशीसाठी बोलावले होते.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्री राखी सावंत उद्या पुन्हा एकदा पोलीस ठाण्यामध्ये येऊन जबाब नोंदवणार आहे. त्यावेळी चौकशीदरम्यान ती दोषी आढळल्यास तिला अटक केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राखी सावंत ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. राखीने काही दिवसांपूर्वी आदिल खान दुर्रानीसोबत लग्न केले. राखीने आदिल खानसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करुन तिच्या विवाहाची माहिती चाहत्यांना दिली.

- Advertisement -

त्याशिवाय, सोशल मीडियाच्या माध्यामातून राखी ही तिच्या वैयक्तिक आयुष्याची माहिती तिच्या चाहत्यांना देते. विविध कार्यक्रमांमधून राखी प्रेक्षकांच्या भेटीस येत असते. बिग बॉस-14 (Bigg Boss-14), नच बलिये, बिग बॉस-15 (Bigg Boss 15) आणि बिग बॉस मराठी-4 या कार्यक्रमांमधून राखी प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. राखी तिच्या विनोदी शैलीने नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन करते.


हेही वाचा – पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मेट्रोतून प्रवास, तरुणांबरोबर स्थानिकांशी साधला संवाद

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -