बेस्ट उपक्रमाकडून रक्षाबंधनाची भेट! २२१ जादा बसेस

सणासुदीला ट्रेनमधून प्रवास न करता येणाऱ्या नागरिकांना बेस्टकडून काहीसा दिलासा मिळणार आहे.

BEST “Super Saver” Travel Plan, Passengers Can Choose Plan Based On Individual Needs
मुंबईकरांचा प्रवास आणखीन 'बेस्ट' होणार

रक्षाबंधनासाठी बेस्ट उपक्रमाने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही बहीण-भावांना भेट दिली आहे. बेस्ट उपक्रमाकडून जादा बसगाड्यांची सुविधा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी रविवारी २२१ जादा बसगाड्या रस्त्यावर धावणार आहेत. त्यामुळे सणासुदीला ट्रेनमधून प्रवास न करता येणाऱ्या नागरिकांना बेस्टकडून काहीसा दिलासा मिळणार आहे. रक्षाबंधनाचा सण हा भाऊ व बहीण यांच्यासाठी जिव्हाळ्याचा सण आहे. बहीण भावाला राखी बांधून त्याने बहिणीचे रक्षण करावे, ही प्रेमळ अपेक्षा बाळगते.

नियमांचे पालन करण्याचे आवाहन

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव अजूनही कायम आहे. कोरोनाची दुसरी लाट कमी होत असली तरी तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळेच राज्य शासनाने सर्वसामान्य नागरिकांना रेल्वेने प्रवास करण्यास परवानगी देताना काही जाचक नियम घातले आहेत. सर्वांना ट्रेनने प्रवास करण्यात अडचण निर्माण होत आहे. मात्र, बेस्ट उपक्रमाने रक्षाबंधन सणासाठी रविवारी २२१ जादा बसगाड्यांची व्यवस्था केली आहे. परंतु, प्रवाशांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करत बेस्ट बसने प्रवास करावा, असे आवाहन बेस्ट उपक्रमाने केले आहे.


हेही वाचा – मुंबई महापालिकेतील अभियंत्यांच्या पदोन्नतीचा रखडलेला प्रस्ताव मंजूर