घरमनोरंजनअखेर राजामौलीच्या ‘RRR’ चित्रपटाची प्रतिक्षा संपली

अखेर राजामौलीच्या ‘RRR’ चित्रपटाची प्रतिक्षा संपली

Subscribe

दोन स्वातंत्र्य संग्राम सैनिकांच्या आयुष्यावर बेतलेल्या हा चित्रपट आहे.

दाक्षिणचे सुपरहिट दिग्दर्शक एसएस राजामौलीच्या आगामी ‘आरआरआर’ चित्रपटाची तारीख जाहीर झाली आहे. त्यामुळे चाहत्यांची ‘आरआरआर’ चित्रपटाची प्रतिक्षा अखेर संपली आहे. या सिनेमात राम चरण आणि एनटीआर ज्युनिअरसह बॉलिवूड अभिनेता अजय देवगण आणि आलिया भटही झळकणार आहे. हा सिनेमा 13 ऑक्टोबर 2021ला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणारी अभिनेत्री आलिया भटने आपल्या ट्विटर अकाऊंवरुन सिनेमाची तारीखसह फोटो शेअर केली आहे. या तिने, आरआरआरसाठी तयार व्हा, १३ ऑक्टोबर २०२१ ला चित्रपटगृहामध्ये येतो आहे असे कॅप्शन दिले आहे.

- Advertisement -

आआरआरआर चित्रपट एक कालखंड नाटकावर आधारित असून ज्याची कथा ब्रिटिश राजवटीच्या काळात प्रमाणे तयार केली गेली आहे. कथेच्या मध्यभागी दोन स्वातंत्र्यसैनिक आहेत, ज्यात राम चरण आणि एनटीआर ज्युनियर आहेत. हा चित्रपट मूळत: तेलगूमध्ये बनविला जात असून हिंदीसह अन्य भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे. अल्लुरी सीताराम राजू आणि कोमाराम भीम या दोन स्वातंत्र्य संग्राम सैनिकांच्या आयुष्यावर बेतलेल्या या चित्रपटात अभिनेता राम चरण आणि ज्युनिअर एनटीआर मुख्य भूमिकेत आहेत. अजय देवगण या दोघांच्या गुरुची भूमिका साकारताना दिसणार आहे. राजमौली यांचे सिनेमे नेहमीच बिग बजेट आणि लार्जन दॅन लाईफ असतात. प्रत्येक सीनसाठी मेहनत घेत पाण्यासारखा पैसा खर्च करतात. त्याचप्रमाणे या सिनेमातील दोन सीनसाठी फक्त राजमौली यांनी 40 कोटी खर्च केले आहेत. त्यामुळे ‘आरआरआर’ हा भारतीय सिनेमाच्या इतिहासातील कदाचित पहिला चित्रपट आहे.


हेही वाचा- ‘या’ दिवशी ‘The Kapil Sharma Show’ घेणार प्रेक्षकांचा निरोप!

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -