घरमुंबईरामदास आठवले यांचा प्रकाश आंबेडकरांना अप्रत्यक्ष टोला

रामदास आठवले यांचा प्रकाश आंबेडकरांना अप्रत्यक्ष टोला

Subscribe

ज्यांच्या डोक्यात दिल्लीची हवा आहे ते अजूनही गल्लीबोळात आहेत असा टोला रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी प्रकाश आंबेडकर यांचे नाव न घेता लगावला आहे.

ज्यांच्या मनात अहंकार त्यांना कोणतीच गोष्ट पटत नाही. अहंकारातून होणाऱ्या टिकेमुळे आपले काम थांबवायचे नाही तर ती टीका गाडून पुढे जायचे असते असे सांगत ज्यांच्या डोक्यात दिल्लीची हवा आहे ते अजूनही गल्लीबोळात आहेत असा टोला रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी प्रकाश आंबेडकर यांचे नाव न घेता लगावला. दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सभागृहात स्टार महाराष्ट्र अवॉर्ड २०१८ च्या वितरण सोहळ्यात ते बोलत होते. मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा देऊन सामाजिक ऐक्याची भूमिका घेतल्याबद्दल ना आठवलेंचा साप्ताहिक स्टार महाराष्ट्रतर्फे भव्य सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

खास शैलीत दिले उत्तर

हल्ले झाले म्हणून घरी बसणार नाही. काम करणाऱ्या लोकप्रिय व्यक्तीवर अहंकारातून हल्ले होतात. माझ्यावर ज्यांनी अटॅक केला त्यांना हार्ट अटॅक येतो असे यावेळी ना रामदास आठवले आपल्या मिश्किल शैलीत म्हणाले.

- Advertisement -

स्टार महाराष्ट्र अवॉर्ड ने केला गौरव

रिपाइं महिला आघाडीच्या राष्ट्रीय मार्गदर्शक सीमा आठवले यांचा समाजसेविका म्हणून स्टार महाराष्ट्र अवॉर्डने गौरव करण्यात आला. तसेच रिपाइंचे राष्ट्रीय प्रवक्ते अविनाश महातेकर यांच्या आंबेडकरी चळवळीतील विशेष योगदानाबद्दल स्टार महाराष्ट्र अवॉर्ड ने त्यांचा गौरव करण्यात आला. चित्रपट क्षेत्रातील योगदनाबद्दल महेश कोठारे यांचा स्टार महाराष्ट्र अवॉर्ड चा सन्मान त्यांच्या स्नुषा अभिनेत्री उर्मिला कोठारे यांनी स्वीकारला. तसेच आमदार कालिदास कोळंबकर यांचाही स्टार महाराष्ट्र्र अवॉर्ड ने गौरव करण्यात आला. यावेळी पत्रकार किरण नाईक; व्यंगचित्रकार विकास सबनीस; शरीरसौष्ठवपटू एशियाश्री सुनीत जाधव; यांसह अनेक मान्यवरांचा ना रामदास आठवले यांच्या हस्ते स्टार महाराष्ट्र्र अवॉर्ड २०१८ ने गौरव करण्यात आला.

सरकारच्या निर्णयाचे स्वागत

मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देणारा निर्णय मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी घेतला आहे त्या निर्णयाचे आपण स्वागत केले आहे. मात्र देशभरातील मराठा; जाट; गुज्जर; पटेल; लिंगायत ; ब्राह्मण या सवर्णांमधील आर्थिक दुर्बलांना आरक्षण मिळण्यासाठी संसदेत आर्थिक निकषावर २५ टक्के आरक्षणाचा कायदा करणे आवश्यक आहे. त्यासाठी आपला प्रयत्न सुरू असल्याचे ना रामदास आठवले म्हणाले. शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळाला पाहिजे त्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याची घोषणा ना रामदास आठवले यांनी यावेळी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -