वर्ल्ड स्टॅम्प चॅम्पियनशिपमध्ये ‘रामप्रसाद महुरकर’ यास कांस्यपदक

इंडोनेशियातील जकार्ता येथे नुकत्याच पार पडलेल्या वर्ल्ड स्टॅम्प चॅम्पियनशिपमध्ये रामप्रसाद महुरकर  या तरुणाने कांस्यपदक मिळवले आहे.

इंडोनेशियातील जकार्ता येथे नुकत्याच पार पडलेल्या वर्ल्ड स्टॅम्प चॅम्पियनशिपमध्ये रामप्रसाद महुरकर  या तरुणाने कांस्यपदक मिळवले आहे. ४ आणि ५ ऑगस्ट रोजी फेडरेशन इंटरनॅशनल डी फिलाटेलीतंर्गत या स्पर्थेचे आयोजन करण्यात आले होते.

वयाच्या १२ व्या वर्षांपासून रामप्रसाद फुलपाखरांच्या थीमवर आधारित स्टॅम्प प्रदर्शनात सहभाग घेत आहे. रामदास बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचा सदस्य असून त्याच्याकडे ६५ देशातील विविध प्रकारच्या पोस्टाच्या तिकिटांचा संग्रह आहे. त्याचबरोबर कवर्स आणि माहितीपुस्तकांचा मोठा संग्रही त्याच्याकडे आहे. २०१६ साली बॉम्बे नॅचरल हिस्ट्रीने रामदास याच्याजवळील तिकिटांचे प्रदर्शनही भरवले होते. आपल्या याच आगळ्या छंदातून रामप्रसाद याने अनेक नॅशनल आणि इंटरनॅशनल पदके मिळवली असून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. यात INPEX 2019- राष्ट्रीय स्तरावरील पोस्टाच्या तिकिटांचे प्रदर्शनातही रामप्रसाद याने कांस्यपदकावर मोहोर उमटवली होती. तसेच आंतरराष्ट्रीय पोस्ट तिकिटावर आधारित प्रदर्शनातही त्याने (ISWSC)बेस्ट युज ऑफ वर्ल्डवाईड (ATA)स्टॅम्प अँंड मटेरियल अॉर्ड जिंकले होते. तर २०१९ मध्येही युथ अवार्डवर आपले नाव कोरले.

रामदास फिलाटेलिक सोसायटीज रॉयल फिलाटेलिक सोसायटी लंडन, (RPSL),फिलाटेलिक सोसायटी ऑफ इंडिया (PSI), डेक्कन फिलाटेलिक सोसायटी (DPS), कर्नाटक फिलाटेलिक सोसायटी (KPS) आणि नागपूर फिलाटेलिक सोसायटीचे सदस्य आहेत. रामप्रसाद यांच्या या गौरवास्पद कामगिरीचे मुंबईचे इतिहासतज्ज्ञ राजन जयकर यांनीही कौतुक केले असून संशोधनातून अतिशय अभ्यासपूर्ण असा हा संग्रह रामप्रसाद यांनी तयार केल्याचे म्हटले आहे.

रामप्रसाद हा मुंबईतील सेंट झेवियर्सचा विद्यार्थी असून बीएच्या प्रथम वर्षाचा अभ्यासक्रम शिकत आहे. रामदास याचा जन्म नागपूर येथील असून त्याचे प्राथमिक शिक्षणही य़ेथेच झाले आहे. रामप्रसाद याच्या या विजयी प्रवासात त्याच्या कुटुंबाबरोबरच त्याच्या शिक्षक आणि हितचिंतकाचाही मोठा वाटा असल्याचे त्याने म्हटले आहे. भविष्यात रामप्रसाद याला क्रिटीकल अॅनालिस्ट व्हायचे असून एन्वायरमेंट लॉही करण्याची त्याची इच्छा आहे. तिकिटांच्या संग्रहाव्यतिरिक्त भारतीय क्लासिकल संगीत, आणि लेखनाची रामप्रसाद याला आवड आहे. तो ब्लॉगरही असून WWW.blueeyedbuoy.wordpress.com यावर त्याचे वाचनिय ब्लॉग्ज आहेत.