घरदेश-विदेशRanjit Savarkar: स्वातंत्र्यवीर सावरकरांना 'भारतरत्न' कधी? नड्डांच्या भेटीनंतर रणजीत सावरकरांचं महत्त्वाचं विधान

Ranjit Savarkar: स्वातंत्र्यवीर सावरकरांना ‘भारतरत्न’ कधी? नड्डांच्या भेटीनंतर रणजीत सावरकरांचं महत्त्वाचं विधान

Subscribe

रणजित सावरकर यांनी स्वातंत्र्यवीर यांना भारतरत्न देण्याची कुटुंबीयांनी कधीच मागणी केली नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

मुंबई: भारतरत्न पुरस्कारांची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. त्यानंतर पुन्हा एकदा स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी करण्यात आली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी ही मागणी केली आहे. यावर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू रणजित सावरकर यांनी स्पष्ट विधान केलं. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी वीर सावरकरांना भारतरत्न देण्याबाबत महत्त्वाचं भाष्य केलं आहे. (Ranjit Savarkar When will freedom hero Savarkar get Bharat Ratna Important statement of Ranjit Savarkar after meeting J P Nadda)

जे पी नड्डा यांनी बुधवारी 21 फेब्रुवारीला दादर छत्रपती शिवाजी पार्क येथील स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी वास्तव्य केलेल्या ‘सावरकर सदन’ या त्यांच्या निवासस्थानाला सदिच्छा भेट दिली आणि सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई अध्यक्ष आशीष शेलार, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर उपस्थित होते.

- Advertisement -

भारतरत्न देण्याची मागणी आम्ही कधीच केली नाही…

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्याची मागणी केली का? असा प्रश्न रणजित सावकरांना विचारण्यात आला होता. यावर रणजित सावरकर यांनी स्वातंत्र्यवीर यांना भारतरत्न देण्याची कुटुंबीयांनी कधीच मागणी केली नसल्याचं स्पष्ट केलं आहे. जनतेनं सावरकरांना स्वातंत्र्यवीर ही पदवी दिली आहे. ती आमच्यासाठी सर्वात मोठी असल्याचं, रणजित सावरकर म्हणाले.

रणजित सावरकर म्हणाले की, विद्यमान सरकार हे वीर सावरकरांच्या विचारांवर चालणारं सरकार आहे. वीर सावरकर यांचे विचार घेऊन पुढे जातील त्यांच्या मागे आम्ही उभे राहू. भारतरत्न पुरस्काराबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केलं की, सावरकर कुटुंबियांनी अशी मागणी कधीच केली नाही.

- Advertisement -

(हेही वाचा:DG Rashmi Shukla : पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांचे पोलिसांसाठी परिपत्रक, घेतला महत्त्वाचा निर्णय)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -