घरक्राइमखंडणीसह फसवणूक प्रकरणात भाजपचे आमदार लोढा यांच्यासह ३ जणांवर गुन्हा; कंपनीने आरोप...

खंडणीसह फसवणूक प्रकरणात भाजपचे आमदार लोढा यांच्यासह ३ जणांवर गुन्हा; कंपनीने आरोप फेटाळले

Subscribe

मुंबईतील सुप्रसिद्ध बिल्डर आणि भारतीय जनात पक्षाचे मुंबई अध्यक्ष, आमदार मंगलप्रभात लोढा यांच्यासह त्यांच्या मुलाविरोधात पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबईतील सुप्रसिद्ध बिल्डर आणि भारतीय जनात पक्षाचे मुंबई अध्यक्ष, आमदार मंगलप्रभात लोढा यांच्यासह त्यांच्या मुलाविरोधात पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ४ कोटी २५ लाखांची खंडणी आणि फसवणूक केल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशाने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे समोर आले आहे.

नेमके काय घडले?

एका ५३ वर्षीय महिलेने मुंबईतील वरळी भागात असलेल्या लोढा पार्कमधील ‘मार्किंग्ज’ या गृहप्रकल्पात सदनिका खरेदी करण्याचे ठरवले. सदर गृहप्रकल्पातील सदनिकेचे मूल्य ५ कोटी ५९ लाख २७ हजार रुपये ठरविण्यात आले होते. त्यानुसार, त्या महिलेने २०१३ नंतर लोढा यांना वेळोवेळी ३ कोटी ९२ लाख रुपये दिले. मात्र, गेल्या ९ वर्षात महिलेला सदनिकेचा ताबा मिळाला नाही. त्यामुळे अखेर त्यांनी सदर सदनिका खरेदी व्यवहार रद्द करण्याचे ठरवले. दरम्यान, व्यवहार रद्द करण्याचे ठरवल्याने लोढा आणि त्यांचा मुलगा अभिषेक लोढा यांनी व्यवहार रद्द करु शकत नाही, असे सांगण्यात आले. तसेच वेळोवेळी त्याची रक्कम वाढवून सांगत आणखी ४ कोटी १५ लाख १५ हजार ३८६ रुपये भरा अन्यथा तुमची अग्रीमेंट टू सेल रद्द करण्यात येईल, असे देखील सांगण्यात आले. दरम्यान, वाढीव रक्कम भरण्यासाठी आरोपींनी बळजबरी केली असून फसवणूक करून खंडणी मागितली असल्याचे फिर्यादीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. तसेच वरळीतील लोढा पार्क या इमारतीतील ३९०१ विंग A हा फ्लॅट हडप केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान न्यायालयाच्या आदेशानंतर चतु:शृंगी पोलिसांनी याप्रकरणी भाजप आमदार मंगलप्रभात लोढा यांच्यासह तिघांवर हा गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisement -

लोढा कंपनीने कोणतेही गैर काम केलेले नाही

याबाबत लोढा कंपनीचे प्रवक्ते म्हणाले, ‘तक्रारदारही दोषी आहे, जिने अनेक वर्षांपासून थकबाकी रक्कम भरलेली नाही. आज रेरानुसार आकारण्यात आलेले शुल्क भरण्यास तिने नकार दिला. आम्ही १२ महिन्यांहून अजिक काळापासून या चुकारपणा आणि कॅन्सलेशनसाठी चकरा मारतो आहोत. अखेर याविरोधात तक्रार दाखल केली आहे. गेल्यावर्षी मुंबईतील संबंधित पोलिस ठाण्यात यासंदभाात तक्रार दाखल केली होती. आजूनही तक्रारदाराने कोणतेही सबळ पुरावे न दिल्याने ही केस बंद करण्यात आली. यामुळे कंपनीने कोणतेही गैर काम केलेले नाही, असा दावा प्रसिद्धी केलेल्या पत्रकात करण्यात आला आहे.


हेही वाचा – सचिन वाझे यांच्या अटकेची शक्यता, वाझेंच्या स्टेट्सने उडवली खळबळ

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -