Monday, August 2, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर मुंबई परमबीर सिंह, डीसीपी, एसीपी यांच्यासह आठ जणांविरुद्ध खंडणीचा गुन्हा

परमबीर सिंह, डीसीपी, एसीपी यांच्यासह आठ जणांविरुद्ध खंडणीचा गुन्हा

दोन जणांना अटक

Related Story

- Advertisement -

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह मुंबई गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त, ६ पोलीस अधिकारी आणि दोन खासगी इसम अशा एकूण आठ जणांविरुद्ध मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात खंडणी, धमकी देणे, बोगस दस्तावेज तयार करणे याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाण्यातील एका बांधकाम व्यावसायिकाच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी दोन खासगी इसम आणि बांधकाम व्यावसायिक असणारे संजय पुनामिया, सुनील जैन या दोघांना गुरुवारी अटक करण्यात आली आहे. या दोघांना किल्ला न्यायालयात हजर करण्यात आले होते. या दोघांना न्यायालयाने ७ दिवसांंची पोलीस कोठडी सुनावली आहे.

मुंबईच्या मरिन ड्राईव्ह पोलिसांनी बुधवारी रात्री मरिन ड्राईव्ह येथे राहणारे संजय पुनामिया आणि सुनील जैन या दोन बांधकाम व्यावसायिकांना खंडणी, कट रचणे बोगस कागदपत्रे तयार करणे इत्यादी कलमांखाली अटक केली आहे. ठाण्यातील एका बांधकाम व्यावसायिकाच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्यात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अकबर पठाण, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीकांत शिंदे, वांद्रे युनिटचे तत्कालीन प्रभारी पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे, महिला पोलीस निरीक्षक आशा कोरके, संजय पाटील यांचादेखील समावेश असून पोलीस अधिकार्‍यांपैकी अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.

- Advertisement -

तक्रारदार बांधकाम व्यावसायिक श्यामसुंदर अग्रवाल यांच्याविरुद्ध २०१६ मध्ये ठाणे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात अग्रवाल यांना अटक करण्यात आली होती, दरम्यान अग्रवाल हे न्यायालयीन कोठडीत असताना त्यांचा पुतण्या शरद अग्रवाल यांच्याकडे मनोज घोटेकर नावाच्या व्यक्तीला संजय पुनामिया आणि सुनील जैन यांनी पाठवले होते. त्यावेळी मनोज घोटेकर यांनी श्यामसुंदर अग्रवालचे पुतणे शरद अग्रवाल यांना संजय पुनामिया हे ठाणे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचे मित्र असून त्यांचे आर्थिक व्यवहार बघतात, तुम्हाला या कचाट्यातून वाचायचे असल्यास संजय पुनामिया आणि परमबीर सिंग यांची भेट घ्या, असे सांगितले होते. त्यावेळी मनोज घोटेकर याने शरद अग्रवाल आणि शुभम अग्रवाल या दोघांची परमबीर सिंह यांच्या ठाणे कोपरी येथील घरी भेट घडवून आणली होती.

त्यावेळी पोलीस उपायुक्त पराग मणेरे देखील हजार होते. त्यावेळी मणेरे यांनी तक्रारदार यांच्या पुतण्यांना तुमच्या काकांवर मोक्का अंतर्गत कारवाई करणार असून त्यापासून वाचण्यासाठी २० कोटी रुपये द्यावे लागतील असे सांगून मारहाण केली. घाबरून शरद आणि शुभम यांनी ९ कोटी रुपये दिले. संजय पुनामिया याने भाईंदर येथील जमिनीचे बोगस कागदपत्रे तयार करून स्वतःच्या नावावर केली. उर्वरित रक्कम नंतर देण्याचे कबूल केले होते अशी माहिती तक्रादार याने मरीन ड्राईव्ह पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे. २०१८ पासून उर्वरित रकमेसाठी संजय पुनामिया आणि सुनील जैन यांनी गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली होती, असेही जबाबात म्हटले आहे.

- Advertisement -

दरम्यान परमबीर सिंह यांची मुंबई पोलीस आयुक्त म्हणून बदली झाल्यानंतर तक्रारदार श्यामसुंदर अग्रवाल यांच्याविरुद्ध २०२१ मध्ये मुंबई गुन्हे शाखा कक्ष ९ च्या अधिकार्‍यांनी जुहू पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करून छोटा शकीलच्या नावाने खंडणी उकळत असल्याचा आरोप अग्रवाल यांच्यावर लावण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास वांद्य्रातील गुन्ह शाखा कक्ष ९ चे तत्कालीन प्रभारी पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे हे करीत होते. अग्रवाल यांनी केलेल्या आरोपात या गुन्ह्यात अटक न करण्यासाठी नंदकुमार गोपाळे, पोलीस निरीक्षक आशा कोरके यांनी पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांच्या संगनमताने ५० लाखांची मागणी केली होती. अग्रवाल यांनी ही रक्कम अधिकारी आशा कोरके यांना पोहचती केली होती. तसेच एसीपी श्रीकांत शिंदे यांनी मोक्का न लावण्यासाठी २५ लाखांची रक्कम घेतली. दरम्यान संजय पुनामिया याने परमबीर सिंह यांची उर्वरित ११ कोटींची रक्कम न दिल्यास दुसर्‍या गुन्ह्यात आत टाकण्यात येईल अशी धमकी देऊन वारंवार पैशांची मागणी केली. तसेच खोटे दस्तावेज बनवून जमीन हडप केल्याचे तक्रारदार अग्रवाल यांनी जबाबात म्हटले आहे.

- Advertisement -