घरमुंबईआता कुठे गेली ताईगिरी? भाजपा कार्यालयातील महिला विनयभंगावरून महापौरांचा सवाल

आता कुठे गेली ताईगिरी? भाजपा कार्यालयातील महिला विनयभंगावरून महापौरांचा सवाल

Subscribe

बोरिवलीतील भाजपा नगरसेविका कार्यालयात महिला कार्यकर्तीचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी भाजपा कार्यकर्त्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र तक्रार करायला गेलेल्या महिलेवरचं भाजपा नगरसेविका आणि कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. बोरिवलीतील भाजपा नगरसेविका अंजली खेडेकर यांच्या कार्यालयात हा प्रकार घडला आहे.  याघटनेवर आता मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच साकीनाका बलात्कार प्रकरणावरून मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणाऱ्या भाजपा महिला आमदारांच्या भूमिकेवर टीका केली आहे. तुमच्याच कार्यालयातील महिलेवर जेव्हा अत्याचार होते तेव्हा तुमची गुपचिळी का? आता कुठे गेली ताईगिरी? असा सवाल करत महापौरांनी भाजपा महिला आमदारांवर सडकून टीका केली आहे.

अंधेरी साकीनाका बलात्कार प्रकरणानंतर  मुख्यमंत्र्यांनी लगेच वेळ न दवडता आदेश दिले. ज्या आरोपीला पकडले त्याच्यावर कारवाई तर होणारचं आहे. पोलिसांचा गस्त वाढवली. तरीपण भारतीय जनता पार्टीच्या महिलांना मुख्य़मंत्र्यांना पत्र लिहिले आणि सांगितले. तुम्ही मुंबई बदनाम करणार… तुम्ही महाराष्ट्र बदनाम करणार.. मात्र अशा जेव्हा गोष्टी घडणार तेव्हा गुपचिळी राहणार…तेव्हा तोंड बंद करणार… तेव्हा ताईगिरी करणारा नाही… नको तिथे ताईगिरी करायला येणार…याचा अर्थ फक्त तुम्हाला महाराष्ट्र बदनाम करायला आहे. महाविकास आघाडी सरकारला बदनाम करायचं आहे आणि मुंबईला बदनाम करायचं आहे. अशा जहरी टीका महापौरांनी केली आहे.

- Advertisement -

“मुख्यमंत्र्यांनी ज्यापद्धतीने पाऊले उचलली आहेत आणि पुढेही उचलून ते करुन घेतील त्यावरतरी आपण विश्वास ठेवून राहिले पाहिजे. तिथेही तुम्ही राजकारण करणार? तिथेही तुम्ही पत्रबाजी करणार? आणि असं घडल्यानंतर पब्लिसिटी स्टंटसाठी पुढे येणार? आणि अशावेळेला तुमची गुपचिळी असणार. तुमच्याच कार्यालयातील महिलेवर जेव्हा अत्याचार होते तेव्हा तुमची गुपचिळी का?” असा परखड सवाल यांनी भाजपाच्या महिला आमदारांना केला आहे.

“महिलांविरोधात ज्या घडलेल्या गोष्टी आहेत. त्यावर महिला म्हणून लढण्याच्या वेळेला अजेंडे चालवणार तुम्ही? धाय मोकळे रडणार तुम्ही? जे घडले ते अतिशय वाईट होते. मी स्वत: बघितलं , मी स्वत: तिथे गेली… मी थिजून गेली,. मला अख्खी रात्र झोप नाही. पण त्याचा अवडंबन होता कामा नये. उत्तर प्रदेश भाजपाशासित राज्यात महिला अत्याचारांचा कहर झाला आहे. मध्य प्रदेश, कर्नाटक तिथे का गुपचिळी. सर्वात सुरक्षित महाराष्ट्र आणि मुंबईत सर्वांमध्ये भीती निर्माण करायची तेव्हा मात्र स्वत;ची ताईगिरी करायची. आणि स्वत: काही वेगळं करतोय असं दाखवण्यासाठी अजेंडा चालवायचा.”

- Advertisement -

“बोरिवलीत झालेल्या महिलेच्या विनयभंगाची घटना महिला मारहाण झाली. हे एवढं घडूनही नगरसेविका त्या महिलेला मारहाण करणार? मी स्वत: जाऊन बोरिवली पोलिस स्टेशनला भेट देणार आहे.  कुठल्याही महिलेवर अत्याचार झाल्यास आपण मिळून लढूया. सर्वांनी न्याय मिळून देण्यासाठी एकत्र लढूया” असेही त्या म्हणाल्या.

दिव्याखाली अंधार आहे. दुसऱ्या शोधत बसालयचं आपलं झाकतं बसायचं आणि ज्या ताईगिरी करत होत्या त्यांचे फोन बंद आहेत. आपलं ऑफिस का असेना, माझ्यासारखं थोबाड फोडून टाकेन, हिंमतच कशी झाली, कुठल्याही पक्षाच्या कार्यालयात अभय़चं असलं पाहिजे. असही महापौर म्हणाल्या.


Mumbai-Sindhudurg flight : मुंबई- सिंधुदुर्ग विमान प्रवास फक्त २५०० रुपयांत, वाचा फ्लाईटचे वेळापत्रक


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -