घरमुंबईमनसे विभाग प्रमुख वृशांत वडकेला बलात्काराच्या आरोपाखाली अटक

मनसे विभाग प्रमुख वृशांत वडकेला बलात्काराच्या आरोपाखाली अटक

Subscribe

मुंबई:  मुंबईतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मलबार हिल विधानसभेच्या विभाग प्रमुखाला बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी देण्याचे आमिष दाखवत महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप त्याच्यावर झाला आहे. या प्रकरणी एका 42 वर्षीय पीडित महिलेने वि. प. मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मनसेचे मलबार हिल विधानसभेचे अध्यक्ष वृशांत वडके यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. (MNS Vrushant Wadke A case of rape has been registered )

वृशांत वडके यांच्याविरोधात आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत उमेदवारीचे तिकीट देण्याचे आश्वासन दिल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. त्यानंतर सप्टेंबर 2021 ते जुलै 2022 दरम्यान अनेक आमिष दाखवत शारिरीक संबध ठेवत फसवणूक केल्याचाही पीडितेने म्हटले आहे, ज्यानुसार आता पीडितेने मुंबईतील व्हीपी रोड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि कलम 376, 500 आणि 420 नुसार गुन्हा दाखल केला. तसेच आरोपी मनसे विभाग प्रमुख वृशांत वडके याला अटक केली आहे. अटकेनंतर आता त्याला कोर्टात हजर केले जाणार आहे.

- Advertisement -

संबंधित महिलेने काही दिवसांपूर्वी मनसे वरिष्ठांची भेट घेत घडलेला प्रकार सांगितला. यानंतर पक्षाने वृशांत वडके यांच्यावर कारवाई केली. ज्यानंतर चार दिवसांपूर्वी पक्षाने त्यांचा राजीनामा घेतला आहे. संबंधित आरोपी हा गिरगावमध्ये वास्तव्यास असून त्याच्या अटकेनंतर पुढील तपास सुरु आहे, मात्र त्याच्या या कृत्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे.

फेब्रुवारी महिन्यात विभागात सातत्याने राबलेल्या नवनव्या कार्यक्रमांची दखल घेत त्यांनी मनसेच्या मलबार हिल विधानसभा विभाग अध्यक्षपदी वृशांत वडके यांची नियुक्ती करण्यात आली होती.

- Advertisement -

वृशांत वडकेचा मनसे विभाग अध्यक्ष पदाचा राजीनामा

या प्रकरणादरम्यान आरोपी वृशांत वडके याने आपल्या मलबार हिल विधानसभा विभाग अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. त्याने 6 सप्टेंबर रोजी आपल्या राजीनाम्याचा अर्ज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे सोपवला आहे. माझ्या वैयक्तिक कारणामुळे मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे. असे त्यांनी आपल्या राजीनाम्याच्या अर्जत म्हटले आहे.


प्रभादेवी गोळीबार प्रकरणी सदा सरवणकर अडचणीत? पोलिसांकडून पिस्तुल जप्त


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -