घरमुंबईलाखो रुपयांचे आमिष दाखवून अपंग तरुणीवर बलात्कार

लाखो रुपयांचे आमिष दाखवून अपंग तरुणीवर बलात्कार

Subscribe

हा आरोपी तिचा बालपणीचा मित्र असून त्यांने तरुणीवर सतत बलात्कार केला. या सर्व प्रकरणी आरोपीला पोलीस कोठडी सुनावली असून त्यांची लवकरच मेडीकल चाचणी केली जाणार आहे.

लाखो रुपयांचे आमिष दाखवून एका अपंग तरुणीवर बलात्कार झाल्याचा प्रकार मालाड परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी बलात्काराचा गुन्हा नोंद होताच २४ वर्षीय आरोपीस कुरार पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

पिडीत २२ वर्षांची तरुणी मालाड येथे तिच्या आईसोबत राहते. ती अपंग असून तिची आई एका खासगी कंपनीत कामाला आहे. आरोपी हा तिचा बालपणीचा मित्र असून तो नेहमीच तिच्या घरी येत होता. जानेवारी महिन्यांत ती एकटीच घरात होती, यावेळी तिथे आरोपी आला आणि त्याने तिला प्रपोज करून तिला लाखो रुपयांचे आमिष दाखवले होते. त्यानंतर त्याने तिच्यावर जबदस्तीने लैगिंक अत्याचार केला होता.

- Advertisement -

गर्भापात करण्यास केलं प्रवृत्त

मग तो सतत तिच्या घरी येऊन तिला लाखो रुपयांचे आमिष दाखवित होता तसेच तिच्यावर लैगिंक अत्याचार करीत होता. जून महिन्यांत तिला त्रास होऊ लागला. वैद्यकीय तपासणीनंतर तिला ती तीन महिन्यांची गरोदर असल्याचे समजले. या घटनेनंतर त्याने तिला गर्भपात करण्यास प्रवृत्त केले होते. नंतर तिने त्याला संपर्क साधून ही माहिती दिली. मात्र या घटनेनंतर त्याने तिला भेटणे आणि तिच्याशी बोलणे बंद केले होते. लाखो रुपयांचे आमिष दाखवून आरोपीने केवळ आपला वापर केल्याचे निदर्शनास येताच तिने हा प्रकार तिच्या आईला सांगितला.

त्यानंतर त्यांनी कुरार पोलिसांत त्याच्याविरुद्ध लेखी अर्जाद्वारे तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध बलात्कारासह गर्भपात करणे आदी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. याच गुन्ह्यांत पळून गेलेल्या आरोपीला शुक्रवारी पोलिसांनी अटक केली. सध्या तो पोलीस कोठडीत असून त्याची लवकरच मेडीकल चाचणी केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -