घरक्राइमसामूहिक बलात्कार पीडिता विवस्त्र चालली; उत्तर प्रदेशातील संतापजनक प्रकार

सामूहिक बलात्कार पीडिता विवस्त्र चालली; उत्तर प्रदेशातील संतापजनक प्रकार

Subscribe

संबंधीत पीडिता बलात्कारानंतर दोन किलोमीटर चालून घरी गेली. धक्कादायक बाब म्हणजे, त्यावेळी तिला मदत करण्याऐवजी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. शिवाय, अनेकांनी तिचा व्हिडीओ रेकॉर्ड केला.

सामूहिक बलात्कारानंतर संबंधित पीडिता विवस्त्रावस्थेत तब्बल 2 किलोमीटर चालल्याचा धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशात घडला. पाच जणांनी तिचे अपहरण केले होते व सामूहिक बलात्कार केल्याची माहिती समोर येत आहे. (Rape victim walked naked Incident in Uttar Pradesh)

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधीत पीडिता बलात्कारानंतर दोन किलोमीटर चालून घरी गेली. धक्कादायक बाब म्हणजे, त्यावेळी तिला मदत करण्याऐवजी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. शिवाय, अनेकांनी तिचा व्हिडीओ रेकॉर्ड केला. मुरादाबाद-ठाकूरद्वारा रोडवरील या प्रकारात काहीजण तिला मदत करण्याऐवजी व्हिडीओ करताना दिसत आहेत. तसेच, हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

संबंधीत पीडिता घरी परतली तेव्हा मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाला होता. तिने रडत रडत आपबिती सांगितली. याबाबत गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांशी संपर्क साधला असता त्यांनी काहीच कारवाई केली नाही. या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपीचे कुटुंबीय पीडितेला जिवे मारण्याची धमकी देत आहेत, असा आरोपही तिने केलेला आहे.

याबाबत पोलिसांनी चौकशी केली असता, विवस्त्रावस्थेत फिरणाऱ्या मुलीची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. या चाचणीत त्या पीडितेचा बलात्कार झाला असल्याचे समोर आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

- Advertisement -

या घटनेबाबात पीडितेने दिलेल्या माहितीनुसार, ती जवळच्या गावात जत्रेत गेली होती, तेव्हा पाचजणांनी तिचे अपहरण केले व बलात्कार केला. तिने आरडाओरडा केल्यावर एक गावकरी घटनास्थळी पोहोचला. परंतु, तोपर्यंत पाचही आरोपी तिचे कपडे घेऊन फरार झाले होते. या प्रकरणात सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


हेही वाचा – मुंबई उच्च न्यायालयाकडून शिंदे गटाला धक्का, सदा सरवणकरांची मध्यस्थी याचिका फेटाळली

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -