HomeमुंबईRaut about Modi : ...तर मग केमिकल लोचा आहे, संजय राऊत यांची...

Raut about Modi : …तर मग केमिकल लोचा आहे, संजय राऊत यांची मोदींवर बोचरी टीका

Subscribe

मोदी यांच्या 'माणूस' वक्तव्यावर संजय राऊत यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. ते (मोदी) देवच आहेतच. मी त्यांना मानव मानत नाही, देव हा देवच असतो.

(Raut about Modi) मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्या निशाण्यावर कायमच पंतप्रधान नरेंद्र मोदी, केद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपा राहिली आहे. आताही मोदी यांच्यासोबतच्या पॉडकास्टचा ट्रेलर सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. त्यावरूनही मोदी यांच्यावर संजय राऊत यांनी बोचरी टीका केली आहे. (Sanjay Raut’s criticism of Modi in the context of the podcast)

झिरोदाचे सहसंस्थापक आणि प्रसिद्ध पॉडकास्ट ‘पीपल बाय WTF’चे सूत्रसंचालक निखिल कामथ हे सध्या इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात गाजत आहेत. अशातच नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या पॉडकास्टचा ट्रेलर सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हा ट्रेलर स्वतः पंतप्रधान मोदी यांनी देखील शेअर केला आहे.

हेही वाचा – Ladki Bahin Yojana : महायुती सरकार भाऊ की वैरी, हे आता भगिनींनी ओळखावे; सचिन सावंतांचे आवाहन

या पॉडकास्टमध्ये पंतप्रधान मोदी यांनी आपला व्यक्तिगत राजकीय प्रवास सांगितला. गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी दिलेल्या एका भाषणाची देखील त्यांनी आठवण सांगितली. त्यावेळी केलेल्या भाषणात आपल्याकडून एक चूक झाल्याचे त्यांनी मान्य केले. चुका होतात… मी माणूस आहे… देव नाही, अशी पुस्तीही त्यांनी या पॉडकास्टमध्ये जोडली.

मोदी यांच्या ‘माणूस’ वक्तव्यावर संजय राऊत यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. ते (मोदी) देवच आहेतच. मी त्यांना मानव मानत नाही, देव हा देवच असतो. ते विष्णूचा 13वे अवतार आहेत. जर कोणी स्वतःला परमेश्वराचा अवतार म्हणत असेल तर, तो मानव कसा असू शकतो? देव मानली जाणारा व्यक्ती जर स्वत:हून म्हणत असेल की, मी एक मानव आहे तर काहीतरी चूक आहे, केमिकल लोचा आहे, असा टोला त्यांनी म्हटले आहे.

काय म्हणाले होते मोदी?

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान एका वृत्तवाहिनीला मोदी यांनी मुलाखत दिली होती. जोपर्यंत माझी आई जिवंत होती, तोपर्यंत मला वाटत होते की मी जैविकदृष्ट्या (बायोलॉजिकल) जन्मलो आहे. तिच्या निधनानंतर, जेव्हा मी माझ्या अनुभवांकडे पाहतो, तेव्हा मला खात्री पटते की, मला देवाने पाठवले आहे. ही ऊर्जा माझ्या शरीरातून निर्माण झालेली नाही तर, देवाने मला ती दिली आहे. त्यामुळे देवानेच क्षमता, शक्ती, शुद्ध हृदय आणि प्रेरणा दिली आहे. मी फक्त देवाने पाठवलेले साधन आहे, असे त्यांनी या मुलाखतीत म्हटले होते. (Raut about Modi : Sanjay Raut’s criticism of Modi in the context of the podcast)

हेही वाचा – Raut vs Fadnavis : राऊतांकडून फडणवीसांचे गुणगान, पण मुख्यमंत्र्यांनी रिकाम टेकडे म्हणत फटकारलं!