भाजपने मोदींचा फोटो पांडुरंगापेक्षा मोठा दाखवत केला संप्रदायाचा अवमान…

Ravikant Warpe accused BJP of deliberately insulting Warkari sect by showing Modi's photo bigger than Panduranga

पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 जूनला देहू येथे संत तुकाराम महाराज यांच्या शिळा मंदिर आणि मूर्तीचा लोकार्पण सोहळ्यासाठी येणार आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेद्र मोदींच्या स्वागताचे फलक शहरात लावण्यात आले आहेत. मात्र, मोशी येथील फलकावर राष्ट्रवादी युवक काँग्रसचे कार्याध्यक्ष रविकांत वरपेंनी आक्षेप घेताल आहे.

देहूत मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखल होणार असून त्यांच्या स्वागतासाठी पिंपरी-चिंचवड शहरात भाजपाकडून ठिकठिकाणी फलक लावण्यात आले आहेत. मात्र, फलकावर विठ्ठलापेक्षा मोदींचा फोटो मोठा असल्याने आक्षेप घेण्यात आला आहे. मोशी येथील एक फलकावरून राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष रविकांत वरपे यांनी आक्षेप घेतला असून त्याबाबत ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी संत ज्ञानेश्वर महाराजांनी वारकरी संप्रदायाचा पाया रचून संत तुकाराम महाराजांनी यावर कळस चढविला.पिं-चिंचवड येथे भाजपाने जाणीवपूर्वक मोदींचा फोटो पांडुरंगापेक्षा जाणीवपूर्वक मोठा दाखवून संप्रदायाचा अवमान केला आहे, असे म्हटले आहे.