Homeताज्या घडामोडीRavindra Waikar : मुंबईत शिवसेना खासदार रवींद्र वायकरांच्या गाडीला अपघात; थोडक्यात अनर्थ...

Ravindra Waikar : मुंबईत शिवसेना खासदार रवींद्र वायकरांच्या गाडीला अपघात; थोडक्यात अनर्थ टळला!

Subscribe

शिवसेना खासदार रवींद्र वायकर यांच्या गाडीला अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. रविवारी (29 डिसेंबर) रात्री 11 वाजताच्या सुमारास हा अपघात झाल्याचे समजते. मुंबईतील पश्चिम द्रृतगती महामार्गाजवळ हा अपघात झाला असून, या अपघातात कुठलीही जीवित हानी झालेली नाही.

मुंबई : शिवसेना खासदार रवींद्र वायकर यांच्या गाडीला अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. रविवारी (29 डिसेंबर) रात्री 11 वाजताच्या सुमारास हा अपघात झाल्याचे समजते. मुंबईतील पश्चिम द्रृतगती महामार्गाजवळ हा अपघात झाला असून, या अपघातात कुठलीही जीवित हानी झालेली नाही. परंतु, रवींद्र वायकर यांच्या गाडीचं नुकसान झाल्याचं समजते. (ravindra waikar accident dashed by tempo driver shiv sena mp)

मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना खासदार पश्चिम द्रृतगती महामार्गावरून जोगेश्वारीच्या दिशेने प्रवास करत होते. त्यावेळी जोगेश्वरीच्या एसआरपीएफ कॅम्पच्या प्रवेशद्वाराजवळ त्याच्या गाडीला एका टेम्पो चालकाने धडक दिली. आयशर टेम्पो आणि वायकरांची गाडी असा अपघात झाला. विशेष म्हणजे अपघात झाला त्यावेळी खासदार रवींद्र वायकर हे गाडीतच असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, या अपघातात रवींद्र वायकर यांना कोणतीही दुखापत झालेली नाही.

या अपघाताची माहिती मिळताच वनराई पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत अधिक तपासाला सुरूवात केली. विशेष म्हणजे हा अपघात होता की घातपात या अनुषंगानेही तपास केला जात असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान ज्या टेम्पो चालकाने खासदार रवींद्र वायकर यांच्या गाडीला धडक दिली. त्याचीही पोलिसांकडून चौकशी करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयशर टेम्पो हा टर्न घेत होता. ज्याठिकाणी हा टेम्पो टर्न घेत होता, त्याच ठिकाणी रवींद्र वायकर यांची गाडी होती. मात्र टेम्पो चालक टर्न घेत असताना अचानक बाईक आला. त्यावेळी अंदाज चुकल्याने टेम्पो रवींद्र वायकरांच्या गाडीला टच झाली. विशेष म्हणजे गाडीत ज्या ठिकाणी रवींद्र वायकर बसले होते, त्याच ठिकाणी टेम्पो घासला. या अपघाताच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी टेम्पो चालकाला ताब्यात घेतले असून त्याची अधिक चौकशी केली जात आहे.


हेही वाचा – Mumbai Crime : क्षुल्लक वादातून दादरमध्ये एका व्यक्तीची हत्या; नेमकं प्रकरण काय?