घरमुंबईरविंद्र वायकर यांच्या हस्ते विकास कामांचे भूमिपूजन

रविंद्र वायकर यांच्या हस्ते विकास कामांचे भूमिपूजन

Subscribe

उच्च व तंत्रशिक्षण, गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांच्या हस्ते इस्माइल युसूफ महाविद्यालय, जोगेश्वरी येथील विकास कामांचे भूमिपूजन करणार आहेत.

इस्माइल युसूफ महाविद्यालय हे जोगेश्वरी विधानसभेच्या क्षेत्रातील एक नामांकित महाविद्यालय आहे. या महाविद्यामध्ये विविध विकास कामे होताना दिसतात. त्यामुळेच पहिल्या महाविद्यालय आणि सध्याच्या महाविद्यालयामध्ये मोठ्या प्रमाणात बदल होत आहे. विकास कामांमुळे महाविद्यालयाचा चेहरा-मोहऱ्यामध्ये बदल होणार आहे. बुधवारी महाविद्यालयामध्ये एकूण १६ नवीन विकास कामांचे भूमिपूजन होणार आहे. तसेच उच्च व तंत्रशिक्षण, गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांच्या हस्ते हे भूमिपूजन होणार आहे. सकाळी १०.३० वाजल्यापासून हा कार्यक्रम सुरु होणार आहेत. या विकास कामांमध्ये एनसीसीच्या विद्यार्थ्यांसाठी फायरिंग रेंज, ऑबस्टॅकल ट्रॅक, सीसी कॅमेरा यांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच महाविद्यालयातील शैक्षणिक वर्ष-२०१८ मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा पदवीदान समारंभही वायकर यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.

महाविद्यालयाला नॅकचा ‘अ’ दर्जा

राज्यमंत्री रविंद्र वायकर हे आपल्या निधीतून आणि जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत मंजुर निधीमधून इस्माइल युसूफ महाविद्यालयचे विकास कामे करत आहेत. या महाविद्यालयामध्ये अनेक सोयी-सुविधा निर्माण झाल्याने या महाविद्यालयाला ‘नॅक’चा नुकताच ‘अ’ दर्जाही प्राप्त झाला आहे. महाविद्यालयात चांगले कॅन्टीन, खुला रंगमंच, पायवाट, जॉगिंग ट्रॅक, बगीचा, वृक्षारोपण, पाण्याची व्यवस्था अशा अनेक सुविधा उपलब्ध केल्या आहेत. तसेच १६ नवीन विकास कामांसाठी ११ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.

या विकासकामांचे भूमिपूजन

  • महाविद्यालयाच्या परिसराभोवती संरक्षक भिंत
  • गेट क्र. १ वर दुचाकी करिता पार्कींगची व्यवस्था
  • महाविद्यालयाच्या संपूर्ण परिसरात पथ दिवे
  • सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून सीसीटीव्ही कॅमेरे
  • एनसीसीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑबस्टॅकल ट्रॅक तसेच फायरिंग रेंजचे बांधकाम
  • महाविद्यालयाच्या आवारातील गार्डनमध्ये मुख्य इमारत ते सभा मंडपदरम्यान पेव्हर ब्लॉक लावणे
  • महाविद्यालयाच्या आवारातील निवासस्थानाचे नुतनिकरण आणि दुरुस्ती
  • यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी वर्ग खोल्या बांधणे
  • विद्यार्थ्यांकरता स्टेशनरी रुम उभारणे
  • इलेक्ट्रॉनिक्स प्रयोगशाळेच नुतनीकरण
  • वसतीगृहाचे नुतनीकरण
  • अधिक्षक निवासस्थानाचे नुतनीकरण
  • उर्दु ग्रंथालयाचे नुतनीकरण
  • महाविद्यालयातील विद्यार्थीनी कक्ष ते प्राचार्य बंगला
  • स्टॅक रुम व जिमखाना विभागा या ठिकाणी संरक्षण तारेचे कुंपण तयार करणे
  • महाविद्यालयाच्या दोन्ही गेटवर सुरक्षा रक्षकांसाठी कॅबिन व पाणपोईची व्यवस्था
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -