घरमुंबईपीएमसी बँकेच्या खातेदारांचा पैसा सुरक्षित; आरबीआयचा निर्वाळा

पीएमसी बँकेच्या खातेदारांचा पैसा सुरक्षित; आरबीआयचा निर्वाळा

Subscribe

येत्या ३० ऑक्टोबरपर्यंत पीएमसी बँकेबाबतचा निर्णय जाहीर करण्यात येईल, असे आश्वासन आरबीआयच्या अधिकार्‍यांनी दिले आहे.

पंजाब अ‍ॅण्ड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेच्या (पीएमसी बँक) खातेधारकांचा पैसा सुरक्षित असून रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर त्यावर लक्ष ठेवून आहेत, असा निर्वाळा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अधिकार्‍यांनी दिला आहे. तसेच बँकेबाबत लवकरच निर्णय घेण्यात येऊन तो ३० ऑक्टोबरपर्यंत पत्रकार परिषद घेऊन जाहीर करण्यात येईल, असे आश्वासनही आरबीआयने पीएमसी बँक खातेधारकांना दिले आहे. त्यामुळे पीएमसी बँकेच्या खातेधारकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

हेही वाचा – चेंबुरमध्ये रास्ता रोको आंदोलन चिघळले; पोलिसांवर दगडफेक

- Advertisement -

पीएमसी बँकेच्या खातेदारांकडून आंदोलन

पीएमसी बँकेच्या खातेधारकांना मंगळवारी सकाळी आझाद मैदानावर आरबीआयविरोधात आंदोलन केले. त्यावेळी आरबीआयच्या अधिकार्‍यांनी आंदोलकांच्या शिष्टमंडळाला भेटायला बोलावले होते. शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेत २५ आणि २७ ऑक्टोबर रोजी पीएमसी खातेदारांच्या समस्यांबाबत आरबीआयचे अधिकारी चर्चा करतील. त्यानंतर येत्या ३० ऑक्टोबरपर्यंत पीएमसी बँकेबाबतचा निर्णय जाहीर करण्यात येईल, असे आश्वासन आरबीआयच्या अधिकार्‍यांनी शिष्टमंडळाला दिले. त्यानंतर पीएमसी बँकेच्या खातेधारकांनी आपले आंदोलन स्थगित केले. या आंदोलनात १०० पेक्षा जास्त पीएमसी बँक खातेधारक सहभागी झाले होते.

हेही वाचा – यापुढे निवडणूक लढवणार नाही, राजकारणाने पातळी सोडली – हितेंद्र ठाकूर

- Advertisement -

खातेदारांची अवस्था वाईट; मुलांची फी भरायला पैसे नाहीत

दरम्यान, रिझर्व्ह बँकेने घातलेल्या निर्बंधामुळे अनेक खातेदारांची अवस्था फारच वाईट झाली आहे. काहींना आपल्या मुलांची शाळा-कॉलेज, तसेच क्लासची फी भरताना अडचण येत आहे, काही निवृत्तांना घर कसे चालवायचे, हा प्रश्न पडला आहे, तर काही कंपन्या व उद्योगांच्या मालकांना कामगार, कर्मचार्‍यांचे वेतन देणे, सरकारचा कर भरणे, विजेचे बिल देणे अशक्य होऊन बसले आहे.पीएमसी बँकेचे व्यवस्थापन व एचडीआयएल कंपनी यांनी मिळून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याने आरबीआयने गेल्या महिन्यात निर्बंध घातले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -