घरमुंबईवसईत रसिकांसाठी साहित्य मेजवानी!

वसईत रसिकांसाठी साहित्य मेजवानी!

Subscribe

प्रेक्षकांनी घेतले ‘येता...जाता...क्षण वेचलेले’ चे अनुभव

समर्थ मराठा संस्था वसई संस्थेने येता…जाता…क्षण वेचलेले…! या पुस्तकाच्या वाचनासाठी खुद्द लेखिकेला आमंत्रित करून साहित्याचा छोटासा आनंद मेळावा साजरा केला. 4 जानेवारीला सायंकाळी संपन्न झालेला हा कार्यक्रम छोटा होता, पण संपताना प्रत्येक रसिक मोठा झाला होता. या वैशिष्ठ्यपूर्ण कार्यक्रमात लेखिकेच्या अनुभवाची पेरणी वाचकांना आनंदी करून गेली होती.

लेखिका डॉ. अपेक्षा खामकर यांनी वाचनासाठी निवडलेला पृ. क्र.90 वरील ‘रस्ता’हा लेख सर्वांनाच आपला वाटला. रस्त्याची विविध रूपं, त्याच्या वेदना वाचकांसमोर लेखिकेने अलगद उलगडली. यावेळी ‘रस्ता आपला जिवलग असून तो अध्यात्मिक, सार्वजनिक आणि इतर अनेक मार्गांवर नेऊन सोडतो’ असे सांगून गोपाळ परब पुढे म्हणाले की ‘रस्त्यावर नामनिर्देश फलक आवश्यक आहेत.’

- Advertisement -

यावर लेखिकेने म्हटले की, यामुळे रस्त्याला घाव सोसावे लागतात, त्याच्या वेदनेची जाणीव करून देणारा हा लेख आहे. या संवादातून लेखिकेची संवेदनशीलता समोर आली.

‘तो …ती…ते…’या पृष्ठ क्रमांक 50 वरील ‘तृतीय पंथां’वरील छोटासा लेख या समुदायातील मोठ्या दु:खासहित सर्वांसमोर वाचनातून आला. या समुदायाबद्दलची किळस मागे पडून एक कणव वाचकांमध्ये रूजवण्यात लेखिका यशस्वी झाली.
लेखिकेने आपल्या जीवनातील वेगवेगळे रस्ते आणि त्यातून सापडलेले मार्ग यावरही मोकळेपणाने भाष्य केले.

- Advertisement -

छोटासा पण देखणा आणि मनाला आल्हाद देणारा हा कार्यक्रम संपूच नये असे वाटतानाच अलगद वेळेच्या वळणावर येऊन संपन्न झाला. या लेखिकेचे हे उल्लेखनीय पुस्तक वाचताना आपणही त्याचा एक भाग होऊन जातो, नव्हे आपलेच प्रतिबिंब त्यात दिसू लागतं, असे विजय पाटील यांनी सांगितले. ओघवती आणि सहज सोपी भाषा यामुळे थोरांपासून लहानांपर्यत हे पुस्तक वाचनीय झाल्याचे वाचकांनी आवर्जून सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -