घरताज्या घडामोडीपावसाळ्यात महापालिकेचे विभागीय नियंत्रण कक्ष मनुष्यबळासह सज्ज

पावसाळ्यात महापालिकेचे विभागीय नियंत्रण कक्ष मनुष्यबळासह सज्ज

Subscribe

प्रत्येक नियंत्रण कक्षांमध्ये थेट दूरध्वनी सेवा देण्यात आली आहे. या सोबतच बिनतारी यंत्रणा व ४ हॉट लाईन्स देखील प्रत्येक विभागीय नियंत्रण कक्षात कार्यान्वित करण्यात आले आहेत.

महापालिकेच्या मुख्य आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाच्या धर्तीवर सर्व २४ प्रशासकिय विभागांमध्ये विभागीय नियंत्रण कक्ष प्रथमच स्वतंत्र मनुष्यबळासह सुसज्ज करण्यात आले आहेत.  या प्रत्येक नियंत्रण कक्षांमध्ये थेट दूरध्वनी सेवा देण्यात आली आहे. या सोबतच बिनतारी यंत्रणा व ४ हॉट लाईन्स देखील प्रत्येक विभागीय नियंत्रण कक्षात कार्यान्वित करण्यात आले आहेत. या हॉटलाईन्सद्वारे मुख्य आपत्कालीन व्यवस्थापन कक्ष, संबंधित परिमंडळीय सहाय्यक पोलीस आयुक्त, स्थानिक अग्निशमन केंद्र व शहर आपत्ती व्यवस्थापन संस्थेतील पर्यायी नियंत्रण कक्ष यांच्याशी तात्काळ संपर्क साधता येणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.

मुंबई महानगरपालिकेने ‘मान्सून – २०२०’ बाबत सर्वतोपरी यंत्रणा सुसज्ज आणि सतर्क ठेवली असून, प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही आपली यंत्रणा सुसज्ज ठेवली आहे. महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी याबाबत वेळोवेळी आढावा घेतला आहे. यावेळी विविध प्राधिकरणांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. मुंबई पोलि‍सांमार्फत मुंबईत बसविण्यात आलेल्या ५२५८ सिसिटीव्ही कॅमे-यांचे थेट प्रक्षेपण पाहण्याकरिता व्हिडीओ वॉलची सुविधा. सिसिटीव्ही कॅमे-यांद्वारे प्राप्त होणाऱ्या थेट चलत छायाचित्रणाचे नियमित निरि‍क्षण आणि याद्वारे संबंध मुंबई शहरावर नियंत्रण ठेवण्यात येते. नियंत्रण कक्षातील संदेशवहन यंत्रणा कोलमडल्यास त्वरि‍त संदेशवहनाकरिता हॅम रेडीओ तयार ठेवण्यात आलेला आहे. आणिबाणी प्रसंगी महापालिका आयुक्त, सर्व अतिरिक्त आयुक्त, परिमंडळीय उपायुक्त व विभागीय सहाय्यक आयुक्त यांच्यातील संदेशवहन सुलभ व्हावे, याकरिता अति महत्वाच्या ५३ ठिकाणांसह संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वाहनांमध्ये बिनतारी संदेश (व्हिएचएफ) यंत्रणा कार्यान्वित  करण्यात आली आहे. सर्व विभागीय नियंत्रण कक्षांमध्ये त्या-त्या प्रशासकिय विभागाचा आपत्कालीन आराखडा तयार ठेवण्यात आला आहे.

- Advertisement -

पावसाची नोंद संकेतस्थळावर

६० स्वयंचलित पर्जन्यमापन केंद्र कार्यान्वितः मुंबई शहर व उपनगरात ६० ठिकाणी ६० स्वयंचलित पर्जन्यमापन केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहेत. या पर्जन्यमापन केंद्रांद्वारे दर १५ मिनिटांचा अहवाल नागरिकांच्या माहितीकरिता आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या “dm.mcgm.gov.in” या संकेतस्थळावर स्वयंचलित पध्दतीने नियमित स्वरुपात अद्ययावत केला जातो. “dm.mcgm.gov.in” या संकेतस्थळावर मान्सून कालावधीत  समुद्रास येणा-या भरती-ओहोटीच्या वेळा व लाटांची उंची, कुलाबा वेधशाळेकडून प्राप्त हवामान अंदाज, मुंबई शहर व उपनगरात होत असलेल्या पावसाचा दर १५ मिनिटांचा अद्ययावत अहवाल, पाणी तुंबल्यामुळे वळविण्यात आलेल्या वाहतूकीची माहिती, लोकल ट्रेन्सची वाहतूक विलंबाने होत असल्यास त्याबाबतची रेल्वे नियंत्रण कक्षाकडून प्राप्त  अद्ययावत माहिती प्राप्त होणार आहे.

संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक 

हेल्पलाईन क्रमांक १९१६:  (१९१६ क्रमांकाच्या ३० लाईन्स हंटींग सुविधेसह तत्पर)

- Advertisement -

थेट दूरध्वनी क्रमांक:  २२६९४७२५ / २७, २२७०४४०३ फॅक्स- २२६९४७१९

विभागीय नियंत्रण कक्षांचे संपर्क क्रमांक

१) ए – २२६२४०००

२)  बी – २३७९४०००

३) सी – २२०१४०००

४) डी – २३८६४०००

५)  ई – २३०१४०००

६)  एफ/दक्षिण –  २४१०३०००

७)  एफ/उत्तर – २४०८४०००

८)  जी/दक्षिण – २४२२४०००

९)  जी/उत्तर – २४३९७८८८ / २४२१२७७८

१०)  एच/पूर्व – २६११४०००

११)  एच/पश्चिम – २६४४४०००

१२)  के/पूर्व – २६८४७०००

१३)  के/पश्चिम – २६२३४०००

१४)  एल – २६५०५१०९

१५)  एम/पूर्व – २५५५८७८९

१६)  एम/पश्चिम – २५२८४०००

१७)  एन – २५०१३०००

१८)  पी/दक्षिण – २८७२७०००

१९)  पी/उत्तर – २८८२६०००

२०) आर/दक्षिण – २८०५४७८८

२१)  आर/उत्तर – २८९३६०००

२२)  आर/मध्य-  २८९३११८८

२३) एस – २५९५४०००

२४) टी – २५६९४०००

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -