Sunday, May 9, 2021
27 C
Mumbai
घर CORONA UPDATE मुंबईत जम्बो कोविड सेंटरला मान्यता

मुंबईत जम्बो कोविड सेंटरला मान्यता

बीपीसीएलच्या रिफायनरी परिसरात होणार केंद्र

Related Story

- Advertisement -

मुंबईत भारत पेट्रोलियमच्या रिफायनरी परिसरात जम्बो कोविड सेंटर सुरू करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिल्याची माहिती विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी ट्विट करून दिली. महाराष्ट्र सरकारने यासंदर्भात केंद्र सरकारला विनंती केली होती. ही विनंती मान्य केल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे आभार मानले आहेत.

- Advertisement -

या जम्बो कोविड सेंटरला अखंडित ऑक्सिजन पुरवठा करण्याची तयारी बीपीसीएलने दर्शविली आहे. त्यामुळे हजारो ऑक्सिजन बेडस येथे उपलब्ध होऊन कोरोनाच्या रुग्णांवर उपचार होऊ शकतील, असे फडणवीस यांनी म्हटले आहे. बीपीसीएलचे संचालक अरुणसिंग यांच्याशी दूरध्वनीवर झालेल्या चर्चेच्या वेळी त्यांनी राज्य सरकारने कम्प्रेसरची व्यवस्था केल्यास ऑक्सिजन सिलेंडर्स भरून देण्याची तयारी दाखवली. यामुळे महाराष्ट्राला मोठा दिलासा मिळणार असल्याचा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.


हेही वाचा – Oxygen Shortage: मुंबईत कोणताही ऑक्सिजनचा तुटवडा नाही, इक्बाल सिंह यांच्या दाव्यानंतर लिंडे कंपनीचं स्पष्टीकरण

- Advertisement -

 

- Advertisement -