Tuesday, February 16, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई विद्यापीठाच्या खात्यात नोंद, पैसे मात्र महाविद्यालयांकडेच; एमकेसीएलचा गलथानपणा

विद्यापीठाच्या खात्यात नोंद, पैसे मात्र महाविद्यालयांकडेच; एमकेसीएलचा गलथानपणा

महाविद्यालयांनी वसूल केलेले विद्यार्थ्यांचे शुल्क एमकेसीएलच्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून विद्यापीठामध्ये भरले जाते. हे शुल्क भरल्याची नोंद विद्यापीठाच्या खात्यात होते, मात्र पैसे महाविद्यालयाच्याच खात्यात पुन्हा येत असल्याचा प्रकार घडत आहे. त्यामुळे विद्यापीठाला मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Related Story

- Advertisement -

मुंबई विद्यापीठाकडून रेड कार्पेट घातलेल्या एमकेसीएलमुळे विद्यापीठाला नेहमीच टीकेचे धनी व्हावे लागत आहे. त्यातच आता एमकेसीएलच्या नव्या सॉफ्टवेअरमुळे विद्यापीठाला मोठा फटका बसत आहे. महाविद्यालयांनी वसूल केलेले विद्यार्थ्यांचे शुल्क एमकेसीएलच्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून विद्यापीठामध्ये भरले जाते. हे शुल्क भरल्याची नोंद विद्यापीठाच्या खात्यात होते, मात्र पैसे महाविद्यालयाच्याच खात्यात पुन्हा येत असल्याचा प्रकार घडत आहे. त्यामुळे विद्यापीठाला मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मुंबई विद्यापीठाने विद्यार्थ्यांचे शुल्क जमा करणे व त्यांचा डेटा संकलित करण्यासाठी एमकेसीएल कंपनीची नियुक्ती केली आहे. कंपनीच्या कारभाराबद्दल विद्यापीठातील कर्मचारी, अधिकारी, प्राध्यापकांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी असतानाही नुकतेच विद्यापीठाने एमकेसीएलला नुकतेच दोन वर्षांची मुदतवाढ दिली. ही मुदतवाढ दिल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच पुन्हा विद्यापीठाला एमकेसीएलच्या कारभाराचा फटका सहन करावा लागला आहे. विद्यापीठाशी संलग्न कॉलेजांकडून विद्यार्थ्यांकडून घेतलेले शुल्क एमकेसीएलच्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून विद्यापीठाला पाठवण्यात येते. प्रत्येक तुकडीचे शुल्क हे अंदाजे लाखांपर्यंत असते. प्रथम, द्वितीय व तृतीय अशा तिन्ही वर्षाच्या वर्गातील तुकड्यांचे शुल्क हे एमकेसीएलच्या पोर्टलमार्फत भरले जाते. या सॉफ्टवेअरमधून पूर्वी दररोज कोठून पैसे आले आणि कोठे गेले याची इत्यंभूत माहिती मिळत असे. त्यामुळे हिशोब ठेवणे सोपे जात होते. परंतु नवीन करार झाल्यानंतर एमकेसीएलने पैसे भरण्यासाठी नवीन सॉफ्टवेअर घेतले. या सॉफ्टवेअरमधून चालू शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांचे शुल्क भरण्यास महाविद्यालयांनी सुरुवात केली. त्यावेळी महाविद्यालयांनी सॉफ्टवेअरच्या माध्यमातून विद्यापीठाकडे भरलेले पैसे पुन्हा त्यांच्या खात्यात आले. पैसे परत आल्याने महाविद्यालये संभ्रमात पडली. त्यामुळे त्यांनी विद्यापीठात जाऊन ही बाब परीक्षा नियंत्रक व प्रशासकीय अधिकार्‍यांच्या निदर्शनास आणून दिली. प्रशासकीय अधिकार्‍यांकडून तपासणी केली असता विद्यापीठाच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याची नोंद आहे. परंतु पैसे महाविद्यालयाच्या खात्यात पुन्हा जमा झाल्याचे स्पष्ट झाले. हा प्रकार अनेक महाविद्यालयांच्या बाबतीत घडल्याने विद्यापीठामध्ये प्रत्यक्षात पैसे भरण्यासाठी महाविद्यालयांच्या रांगा लागल्या आहेत. यासंदर्भात महाविद्यालयांकडून परीक्षा नियंत्रकांकडे तक्रार करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने महाविद्यालयांना विद्यापीठात येऊन पैसे भरावे लागत आहेत. एमकेसीएलचे सॉफ्टवेअर घेऊन प्रत्यक्षात येऊन पैसे भरावे लागत असल्याने महाविद्यालयांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

लाखो रुपये खर्च करून एमकेसीएलची सेवा घेऊनही विद्यापीठातील कर्मचार्‍यांना मॅन्यूअली काम करावे लागत आहे. त्यामुळे एमकेसीएलवरील खर्चाचा उपयोग काय? या कंपनीच्या कामाचे मूल्यांकन कोण करणार. एमकेसीएलने कामात सुलभता येणार नसेल तर करार रद्द करण्यात यावा. तसेच विद्यापीठाने स्वत:चे स्वतंत्र सॉफ्टवेअर विकसित करावे.
– डॉ. सुप्रिया करंडे, युवासेना सिनेट सदस्य, मुंबई विद्यापीठ
- Advertisement -