खुशखबर! मुंबईतील रिकव्हरी रेट वाढला!

मुंबईत कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले.

Coronavirus recovery rate improves to 63 percent in india
दिलासादायक! देशात रिकव्हरी रेट वाढला; ११ लाख रुग्ण कोरोनामुक्त

एकीकडे कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. तर दुसरीकडे एक दिलासादायक बाब म्हणजे मुंबईतील रिकव्हरी रेट देखील वाढला आहे. मुंबईत कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७० टक्के झाले आहे. आज मुंबईमध्ये कोरोनाचे ९६९ नवे रुग्ण सापडल्याने कोरोनाबाधितांची संख्या ९४ हजार ८६३ वर पोहचली आहे. तर ७० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ५ हजार ४०२ वर पोहचला आहे.

राज्यात २४ तासांत ६,७४१ नव्या रूग्णांची नोंद

राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून राज्यात गेल्या २४ तासांत ६ हजार ७४१ नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. तर दिवसभरात २३१ जणांचा कोरोनाने बळी गेला आहे. यामुळे राज्यात आतापर्यंत एकूण २ लाख ६७ हजार ६६५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच आज दिवसभरात ४ हजार ५०० कोरोना रूग्णांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात आजपर्यंत एकूण १ लाख ४९ हजार ७ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.


हेही वाचा – Corona : पुण्यात गेल्या २४ तासांत २५ रूग्णांचा मृत्यू