घरताज्या घडामोडीआयटीआयमध्ये होणार ७०० जागांची भरती; खासगी संस्थांना प्राधान्य

आयटीआयमध्ये होणार ७०० जागांची भरती; खासगी संस्थांना प्राधान्य

Subscribe

लॉकडाऊनमुळे आरथिक व्यवस्था डबघाईला आल्याने रोजगाराची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत ७०० पदांची भरती करण्यासाठी सरकारने मान्यता दिल्याचे समजते.

लॉकडाऊनमुळे आर्थिक व्यवस्था डबघाईला आल्याने रोजगाराची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत ७०० पदांची भरती करण्यासाठी सरकारने मान्यता दिल्याचे समजते. या भरतीत खासगी आयटीआयला स्थान द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य अशासकीय आयटीआय प्राचार्य आणि कर्मचारी संघटनेकडून करण्यात आली आहे.

विविध पदांच्या भरतीत खासगी संस्थांना प्राधान्य

लॉडाऊनपूर्वी ७०० पदे भरण्याचे आदेश सरकारने व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयाला दिले होते. मात्र, संचालनालयाने दिरंगाई केल्यामुळे १३ एप्रिलला पुन्हा स्मरण पत्र पाठवण्यात आले. पदभरती करुन निवड केलेल्या उमेदवारांना तात्काळ नियुक्ती आदेश द्यावे, असे पत्राद्वारे सांगण्यात आले. लॉकडाऊमुळे सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला सुट्टी असल्याने रिक्त जागा आणि विषयानुसार आवश्यक असलेली निर्देशक यांची माहिती गोळा करण्याची प्रक्रिया शासकीय स्तरावर सुरु आहे. या नोकर भरतीमध्ये आपल्यालाही स्थान मिळावे यासाठी विनाअनुदानित म्हणजे खासगी आयटीआय संस्था आक्रमक झाल्या आहेत. शासन मान्यता प्राप्त विनाअनुदानित तत्वावर चालू असलेल्या खासगी आयटीआयमधील अनुभवी निदेशकांना प्राधान्य द्यावे आणि ३५ वर्षांपासून अनुदानाच्या प्रतिक्षेत असलेल्या कर्मचाऱ्यांना अनुदान द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य अशासकीय आयटीआय प्राचार्य आणि कर्मचारी संघटनेने केली आहे.

- Advertisement -

४२५ च्या आसपास खाजगी आयटीआय या कायम विना अनुदान तत्वावर जवळपास हजारो निदेशक काम करीत आहे. लॉकडाऊन कालावधीत विद्यार्थ्यांना वर्क फ्रॉम होमच्या माध्यमातूनही ते चांगले करीत आहे. अशा कायम विनाअनुदानित आयटीआयमधील निदेशकांना शासकीय सेवेत सामावून घेऊन शासनाने न्याय द्यावा, अशीही मागणी संघटनेचे अध्यक्ष प्राचार्य संजय बोरस्ते यांनी केली आहे.

अशी होणार निवड प्रक्रिया

लॉकडाऊन संपल्यानंतर राज्यातील सर्व जिल्ह्यात एकाच दिवशी भरती प्रक्रिया पार पडेल. प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांच्या नियंत्रणाखाली पदभरती होईल. निर्देशकांची भरती दोन टप्यात होणार आहे. प्रथम ८५ गुणांची लेखी परीक्षा घेतली जाईल. लेखी परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवाराची १५ गुणांची इन कॅमेरा मुलाखत घेतली जाईल. लेखी परीक्षा आणि मुलाखत चार दिवसात पूर्ण करण्याचे प्रशासनाचे नियोजन असल्याचे समजते.

- Advertisement -

हेही वाचा – कोरोनाला रोखण्यासाठी विलगीकरणचे प्रमाण वाढवणे आवश्यक; IIT मुंबईच्या समितीचा अहवाल


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -