घर क्राइम मुले मोठी झाल्याने लिव्ह इनमध्ये राहण्यास दिला नकार, मुंबईत महिलेवर Acid हल्ला

मुले मोठी झाल्याने लिव्ह इनमध्ये राहण्यास दिला नकार, मुंबईत महिलेवर Acid हल्ला

Subscribe

Acid Attack in Mumbai | शुक्रवारी पहाटे ही घटना घडली. महेश पुजारी (६२) असे आरोपीचे नाव असून एलटी मार्ग पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

Acid Attack in Mumbai | मुंबई – लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्यास नकार दिल्याच्या रागातून गिरगावात एका महिलेवर अॅसिड हल्ला करण्यात आला आहे. शुक्रवारी पहाटे ही घटना घडली. महेश पुजारी (६२) असे आरोपीचे नाव असून एलटी मार्ग पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

हेही वाचा – धक्कादायक! पुण्यात एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या, पती-पत्नीसह दोन मुलांचा समावेश

- Advertisement -

पीडित महिला (५२ वर्षे)आपल्या दोन मुलांसह (२४ आणि २६ वर्षे) गिरगावात राहते. पती सोडून गेल्यानंतर गेली २५ वर्षे ती महेश पुजारी याच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहत होती. तसंच, पुजारीचे पहिले लग्न झालेले आहे. पीडित महिलेची दोन्ही मुले मोठी झाल्याने तिने महेश पुजारीसोबत लिव्ह इनमध्ये राहण्यास नकार दिला. तसंच, महेशने आता त्याच्या पहिल्या पत्नीकडे जावं असा पीडितेने तगादा लावला. त्यामुळे महेश पुजारीला राग आला होता. याच रागातून महिला सकाळी साडेपाच वाजता पाणी भरण्यासाठी खाली येताच पुजारीने तिच्यावर अॅसिड हल्ला केला. अंगावर अॅसिड फेकताच तो तिथून पळून गेला. या अॅसिड हल्ल्यामध्ये महिला ५० टक्के भाजली आहे. तिची प्रकृती सध्या गंभीर असून या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे.

एलटी मार्ग पोलिसांनी याप्रकरणी महेश पुजारीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

- Advertisement -

- Advertisment -