घरमुंबईम्हाडाच्या अर्ज नोंदणीला सुरूवात; आजपासून अर्ज भरता येणार

म्हाडाच्या अर्ज नोंदणीला सुरूवात; आजपासून अर्ज भरता येणार

Subscribe

म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण क्षेत्रविकास मंडळाच्या सदनिकांच्या विक्री सोडतीची ऑनलाईन अर्ज नोंदणी प्रक्रिया आजपासून सुरू झाली. नोंदणीकृत अर्जदारांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास आज दुपारी २ वाजता सुरूवात होणार आहे. ९ ऑगस्टपर्यंत रात्री ११.५९ वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे.

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा)च्या कोकण गृहनिर्माण क्षेत्रविकास मंडळाच्या सदनिकांच्या विक्री सोडतीची ऑनलाईन अर्ज नोंदणी प्रक्रिया आजपासून सुरू झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रक्रियेचा शुभारंभ केला. म्हाडाच्या माहिती व संचार तंत्रज्ञान विभागाने विकसित केलेल्या संगणकीय सोडत प्रक्रियेच्या आज्ञावलीचे सादरीकरण मुख्यमंत्र्यांनी यावेळी बघितले. सदनिकांच्या सोडतीकरीता ८ ऑगस्टपर्यंत रात्री ११.५९ वाजेपर्यंत अर्जदारांची नोंदणी केली जाणार आहे. कोकण मंडळाच्या सोडतीकरिता प्राप्त अर्जाची संगणकीय सोडत वांद्रे पूर्व येथील गृहनिर्माण भवन या म्हाडाच्या मुख्यालयात १९ ऑगस्ट २०१८ रोजी सकाळी १० वाजता काढण्यात येणार आहे.

आजपासून अर्ज भरता येणार

नोंदणीकृत अर्जदारांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास आजपासून दुपारी २ वाजेपासून सुरूवात होणार आहे. ९ ऑगस्टपर्यंत रात्री ११.५९ वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे. तर ऑफलाईन पद्धतीत १० ऑगस्टपर्यंत सायंकाळी सहा वाजेपर्यंत अनामत रक्कम / अर्ज शुल्क ऑनलाईन भरण्याची मुदत देण्यात आली आहे. सोडत प्रक्रियेकरिता अँक्सिस बँकेची समन्वयक यंत्रणा म्हणून नेमणूक केली आहे.

- Advertisement -

दहा लाख घरांचे उदिष्ट

महाराष्ट्र शासन सर्वसामान्य नागरिकांच्या गृहस्वप्नपूर्तीकरीता कटिबद्ध आहे. म्हाडाच्या कोकण मंडळ व नागपूर मंडळाच्या अखत्यारीतील विविध उत्पन्न गटांकरिता सुमारे दहा हजार सदनिकांची सोडत जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत कोकण मंडळाच्या ३९३७ सदनिका आहेत. तर नागपूर मंडळाच्या १५१४ सदनिकांकरिता केंद्र व राज्य शासनाचे अनुदान मिळणार आहे. त्यामुळे या सदनिका नागरिकांना परवडणाऱ्या दरात उपलब्ध होणार आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत १० लाख घरांचे उद्दिष्ट गाठायचे असल्याने राज्यातील सर्व संबंधित संस्थांनी या नियोजनपूर्तीच्या दिशेने युद्धपातळीवर कामे करावीत. प्रधानमंत्री आवास योजनेतील जास्तीत जास्त सदनिकांचा समावेश या सोडतीत करावा, असेही याप्रसंगी फडणवीस यांनी सांगितले.

अर्जदारांसाठी हेल्पलाईन

कोंकण मंडळाच्या सोडत प्रक्रियेत अर्जदारांनी मदतीकरिता ९८६९९८८००० व ०२२-२६५९२६९२/९३ या हेल्पलाईन क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन म्हाडाचे उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर यांनी केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -