बनावट को-विन लसीकरण नोंदणीची वेबसाइट कशी ओळखाल ?

कोरोना लस घेण्यासाठी आधी को-विन अॅपवर रजिस्ट्रेशन करावे लागते. मात्र या को- विनच्या नावे  बनावट वेबसाइटवर रजिस्ट्रेशन केले जात आहे. याबाबत सरकारने नागरिकांना अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. या  बनावट वेब साइटवरुन नागरिकांची कशी फसवणूक केली जाते ते जाणून घ्या आणि अशा खोट्या वेबासाइटला बळी पडू नका.