Thursday, June 8, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी अखेर तारीख ठरली! म्हाडाच्या घरांची नोंदणी 'या' दिवसापासून होणार सुरू

अखेर तारीख ठरली! म्हाडाच्या घरांची नोंदणी ‘या’ दिवसापासून होणार सुरू

Subscribe

गेल्या अनेक दिवसांपासून म्हाडाचे (Mhada) घर घेण्याचे स्वप्न असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळासाठी ग्राहकांना गुरूवारपासून (५ जानेवारी २०२३) नोंदणी करता येणार आहे. विशेष म्हणजे म्हाडाच्या मुंबई मंडळासाठी एकच कायमस्वरूपी नोंदणी सुरू करण्यात आली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून म्हाडाचे (Mhada) घर घेण्याचे स्वप्न असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळासाठी ग्राहकांना गुरूवारपासून (५ जानेवारी २०२३) नोंदणी करता येणार आहे. विशेष म्हणजे म्हाडाच्या मुंबई मंडळासाठी एकच कायमस्वरूपी नोंदणी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे एकदाच नोंदणी करून त्या क्रमांकाद्वारे कोणत्याही मंडळासाठी अर्ज करता येणार आहे. (Registration Service For Mhada Houses From Thursday Mumbai)

म्हाडा सोडत प्रक्रियेत बदल करत नवी संगणकीय प्रणाली तयार करण्यात आली आहे. आता सोडतीची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आली आहे. ग्राहकांना अर्ज भरतानाच आवश्यक ती कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत.

- Advertisement -

या सोडतीआधीच कागदपत्रांची छाननी करून पात्रता निश्चिती करण्यात येणार आहे. पात्र अर्जदारच सोडतीत सहभागी होऊ शकणार आहेत. त्यामुळे सोडतीत विजयी होणाऱ्याला सोडतीनंतर तात्काळ घराचा ताबा देण्यात येणार आहे.

  • म्हाडाच्या घरासाठी आता एकच कायमस्वरूपी नोंदणी करावी लागेल.
  • कोणीही इच्छुक आता नोंदणी करू शकतो.
  • एखाद्याला ज्या सोडतीसाठी अर्ज करायचा आहे ती जाहीर झाल्यानंतर त्याला अर्ज करता येईल.
  • या नोंदणीचा प्रारंभ गुरुवारपासून होणार आहे.

अशी करा नोदणी

  • एकाच कायमस्वरूपी नोंदणीस गुरुवार, ५ जानेवारी सकाळी ११ वाजता सुरुवात होईल.
  • नव्या बदलानुसार, आता नोंदणी करतानाच इच्छुकांना पॅनकार्ड, आधारकार्डसह उत्पन्नाचा दाखला आणि निवास दाखला सादर करावा लागणार आहे.
  • सामाजिक आणि इतर आरक्षित गटांतील इच्छुकांना संबंधित प्रमाणपत्र सादर करावे लागेल.

- Advertisement -

हेही वाचा – खड्ड्यांचा फटका पुणे महापालिकेला; अपघाती मृत्यूप्रकरणात 16 लाख देण्याचे कोर्टाचे आदेश

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -