घरमुंबईमुंबईतील म्हाडांच्या घरांसाठी 'या' दिवशी निघणार सोडत, 22 मेपासून सुरू होणार नोंदणी

मुंबईतील म्हाडांच्या घरांसाठी ‘या’ दिवशी निघणार सोडत, 22 मेपासून सुरू होणार नोंदणी

Subscribe

गेल्या वर्षभरापासून प्रतिक्षेत असलेली मुंबईतील म्हाडांच्या घरांच्या सोडतेची तारिख जाहीर करण्यात आली आहे. येत्या 18 जुलैला या घरांसाठी सोडत काढण्यात येणार आहे. यासाठी 22 मेपासून इच्छुकांना नोंदणी करता येणार आहे.

मुंबई ही स्वप्नांची नगरी म्हणून ओळखली जाते. त्यामुळे या स्वप्नाच्या नगरीत छोटेसे का असेना पण स्वतःचे हक्काचे घर असावे, असे प्रत्येकाचे स्वप्न असते. पण घरांचे भाव गगनाला भिडल्याने सामान्य माणसाला मुंबईत घर घेणे, हे जवळपास अशक्य आहे. पण यासाठीच म्हाडाकडून दरवर्षी घरांसाठीची सोडत काढण्यात येते. गेल्या वर्षभरापासून प्रतिक्षेत असलेली मुंबईतील म्हाडांच्या घरांच्या सोडतेची तारिख जाहीर करण्यात आली आहे. येत्या 18 जुलैला या घरांसाठी सोडत काढण्यात येणार आहे. यासाठी 22 मेपासून इच्छुकांना नोंदणी करता येणार आहे. (Registration will start from May 22 for Mhada houses in MumbaiRegistration will start from May 22 for Mhada houses in Mumbai PPK) पहाडी गोरेगाव, विक्रोळीतील कन्नमवार नगर, अन्टॉप हिल, बोरिवली, मालाड, दादर परिसरात म्हाडाची घरे असणार आहे.

हेही वाचा – कोकणात वंदे भारत एक्स्प्रेसला आज पंतप्रधानांकडून हिरवा कंदील मिळण्याची शक्यता, चाचणी यशस्वी

- Advertisement -

म्हाडाच्या 4083 घरांसाठी 22 मे रोजी जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. यात अत्यल्प – 2788, मध्यम- 132, उच्च – 38, विखुरलेली – 102 अशी घरे असणार असल्याची माहिती समोर आली आहे. यासाठीची संपूर्ण जाहिरात ही 22 मे रोजी प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर त्याच दिवसापासून इच्छुकांना नोंदणी देखील करता येणार आहे. तर अनामत रक्कमेसह अर्ज भरण्याची अंतिम तारीख 26 जून असणार आहे. रंगशारदा, वांद्रे, पश्चिम या ठिकाणी घरांची सोडत काढण्यात येणार आहे. आहे. घरांची सोडत 18 जुलै 2023 रोजी काढण्यात येणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 26 जूनपर्यंत इच्छुकांना म्हाडाच्या या घरांसाठी अर्ज भरता येणार आहे. त्यानंतर स्वीकृती अर्जांची छाननी करण्यात येणार आहे. यानंतर पात्र अर्जदारांची यादी जाहीर करण्यात येणार आहे. 18 जुलै रोजी सोडत काढण्यात येणार आहे. अल्प गटासाठी गोरेगाव येथे घरे असल्याचे सांगण्यात आले आहे. अल्प गटातील घरांच्या किमती साधारण 30 ते 40 लाख रुपयांपर्यंत आहेत. तर पहाडी भागातील घरांची किंमत साधारण 30 ते 44 लाखांच्या घरात असण्याची शक्यता आहे. तसेच मध्यम गटासाठी 132 घरे असून ही घरे दादर, टिळक नगर (चेंबूर), सहकार नगर (चेंबूर) कांदिवली येथील आहेत. उच्च गटासाठी 39 घरे असून ही घरे ताडदेव, लोअर परळ, शीव (सायन), शिंपोली, तुंगा पवई येथे असणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -