घरताज्या घडामोडीराज्यातील 'या' सात शहरांमध्ये जिओची 5G सेवा सुरू

राज्यातील ‘या’ सात शहरांमध्ये जिओची 5G सेवा सुरू

Subscribe

देशातील आघाडीची टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने देशातील पहिली 5G सेवा सुरु केली. राजसमंद जिल्ह्यातील नाथद्वारा येथील श्रीनाथजी मंदिरात ही 5G सेवा सुरू करण्यात केली. त्यानंतर जिओने महाराष्ट्रातीलही 5G सेवा सुरू केली आहे.

देशातील आघाडीची टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने देशातील पहिली 5G सेवा सुरु केली. राजसमंद जिल्ह्यातील नाथद्वारा येथील श्रीनाथजी मंदिरात ही 5G सेवा सुरू करण्यात केली. त्यानंतर जिओने महाराष्ट्रातीलही 5G सेवा सुरू केली आहे. महाराष्ट्रातील सात शहरांमध्ये आजपासून जिओ 5G नेटवर्क संपूर्णपणे कार्यन्वित करण्यात आले आहे. (reliance jio 5G starts in seven cities of maharashtras)

यामध्ये प्रामुख्याने मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर, नाशिक, अहमदनगर आणि सोलापूर या शहरांचा समावेश आहे. शिवाय देशातील 22 राज्यातील अंदाजे 102 शहरांमध्येही आजपासून जिओ सुरु झाले आहे. 5G नेटवर्क सुरु करण्यात जिओ आघाडी आहे. अशातच कंपनीने अद्याप व्यावसायिक पातळीवर जिओची सुरुवात केलेली नाही.

- Advertisement -

जिओ 5G सेवा पूर्ण सक्षमतेने सर्व यूजर्ससाठी कार्यन्वित झालेली नाही. त्याऐवजी, या शहरांमधील जिओ वापरकर्त्यांना जिओ 5Gसाठी आमंत्रण मिळणार आहे. त्यामध्ये जिओ स्वागत ऑफर, कनेक्ट करण्यासाठी आणि 1 जीबीपीएसपर्यंत अमर्यादित डेटाचा अनुभव घेण्यासाठी, कोणत्याही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही.

दरम्यान, 5 ऑक्टोबर रोजी जिओने दिल्ली, मुंबई, कोलकाता, वाराणसी येथून देशात 5G सेवा सुरू करण्यात आली. राजसमंद जिल्ह्यातील नाथद्वारा येथील श्रीनाथजी मंदिरात ही 5G सेवा सुरू करण्यात आली आहे. कंपनीचे चेअरमन आकाश अंबानी यांनी पत्नीसह नाथद्वारात श्रीनाथजींची पूजा केली. त्यानंतर मोती महलमध्ये आयोजित लाँचिंग कार्यक्रमात टॅबलेटचे बटण दाबून सेवा सुरू केली.

- Advertisement -

भारतात 1 ऑक्टोबर रोजी 5G इंटरनेट सेवेचे उद्घाटन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 5G इंटरनेट सेवेचे उद्घाटन करण्यात आले असून, दिल्लीतील प्रगती मैदानमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 5G सेवेचा स्वत: अनुभव घेतला होता. त्यावेळी उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांचे पुत्र आकाश अंबानी यांनी प्रगती मैदान येथे नरेंद्र मोदी यांना ही 5G सेवा नेमकी कशी काम करते, फायदे काय,कोणत्या प्रकारच्या क्षेत्रांमध्ये याचा सर्वाधिक फायदा होऊ शकतो? यासंदर्भातली माहिती दिली.


हेही वाचा – विमानात महिलेवर लघुशंकाप्रकरणी आरोपी मिश्राचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -