रेल्वे प्रवाशांना दिलासा; मुंबईतील प्लॅटफॉर्म तिकीट दरवाढ अखेर मागे

सीएसएमटी, दादर, एलटीटी, ठाणे, कल्याण आणि पनवेल या स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांचे दर 50 रुपये एवढे करण्यात आले होते.

मुंबईतील रेल्वे फलाटांवर होणारी अनावश्यक होणारी गर्दी टाळण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकिटांचा दर वाढविण्यात आला होता. दरम्यान या दरवाढीतून रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण प्लॅटफॉर्म तिकिटांची केलेली दरवाढ रेल्वे प्रशासनाने मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांसाठी हा मोठा दिलासा आहे.

रेल्वे प्रशासनाकडून मुंबईतील रेल्वे प्लॅटफॉर्मच्या तिकिटांमध्ये दरवाढ केली होती. प्लॅटफॉर्म तिकिटांचे दर 10 रुपयांवरून 30 ते 40 रुपयांवर करण्यात आले होते. या निर्णयाला प्रवाशांकडून विरोध देखील करण्यात आला होता. प्लाटफॉर्मवरील अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी 2015 साली रेल्वे मॅनेजरकडे रेल्वे प्रशासनाने हे अधिकार दिले होते. ल्वेच्या नव्या निर्णयामुळे आता डीआरएमला प्लॅटफॉर्म तिकिटांच्या किंमती वाढवता येणार नाहीत. यामुळे अनेकांना मोठा दिलासा मिळणार आहे. प्लॅटफॉर्म तिकीटचे दर वाढविल्याने रेलवे स्तनांकावर अनावश्यक येणाऱ्यांच्या संख्येत घट होईल असा विश्वास रेल्वेला होता. त्यामूळेच सीएसएमटी, दादर, एलटीटी, ठाणे, कल्याण आणि पनवेल या स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांचे दर 50 रुपये एवढे करण्यात आले होते.

प्लॅटफॉर्म तिकीट दरवाढीचे नेमके कारण काय?
एप्रिल महिन्यात मुंबईतील विविध रेल्वे स्थानक परिसरात अलार्म चेन पुलिंगच्या काही घटना घडल्या होत्या. यावेळी अनेकांनी कोणतेही कारण नसताना लोकलची आपत्कालीन साखळी ओढली होती. अशा परिस्थितीत लोकल आणि इतर एक्सप्रेस रेल्वे उशिरणे घावात होत्या. त्याचा नाहक त्रास इतर प्रवाशांना होत होता. ही बाब लक्षात घेऊन अलार्म चेन पुलिंगच्या घटना रोखण्यासाठी मध्य रेल्वेने प्लॅटफॉर्म तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला.

प्लॅटफॉर्मवरील अनावश्यक गर्दी रोखण्यासाठी सीएसएमटी (CSMT), मुंबई सेंट्रल (Mumbai Central), दादर (Dadar), बोरीवली (Borivali), वांद्रे टर्मिनस (Bandra Terminus) , वापी, ठाणे (Thane), कल्याण (Kalyan), पनवेल (Panvel) वलसाड, उधना आणि सुरत येथील प्लॅटफॉर्म तिकिटांच्या दरात 50 रुरुपयांची दरवाढ केयी होती. दरम्यान मुंबईत ज्याप्रमाणे प्लॅटफॉर्म तिकिटांमध्ये दरवाढ करण्यात होती त्याप्रमाणे दक्षिण रेल्वेने देखील प्लॅटफॉर्म तिकिटांमध्ये दरवाढ केली होती.


हे ही वाचा – दुकानांवरील मराठी भाषेतील पाट्यांबाबतच्या कारवाईला न्यायालयाकडून स्थगिती