घरताज्या घडामोडीकेशवसुत उड्डाणपूलाखालील भिंती लागल्या बोलू

केशवसुत उड्डाणपूलाखालील भिंती लागल्या बोलू

Subscribe

दादर येथील केशवसुत उड्डाणपूलाखालील चित्रांची रंगरंगोटी करत पुलाखाली जागा सुशोभित केली आहे. पण अतिक्रमण करणार्‍या फेरीवाल्यांचे काय?

दादर रेल्वे स्थानकासमोरील केशवसूत उड्डाणपूलाखाली सर्व दुकांनांना हटवून यातील गाळे मोकळे केल्यानंतर तब्बल सहा वर्षांनी या गाळ्यांकडे महापालिका प्रशासनाने लक्ष वेधले आहे. या गाळ्यांमधील दुकानांवर कारवाई करून ते गाळे रिक्त करण्यात आल्यानंतर फेरीवाल्यांनी यामध्ये अतिक्रमण केले आहे. परंतु आता अतिक्रमित गाळ्यांमधील पुलाखालील भिंती चित्रांनी रंगवून सुशोभित केल्या जात आहे. त्यामुळे पुलाखालील गाळे पुन्हा एकदा सुशोभित करून फेरीवाल्यांची विशेष व्यवस्था महापालिका करत आहे.

सर्व परिसर सुशोभित करण्यात येणार

दादर रेल्वे स्थानकाच्या पश्चिम दिशेला असलेल्या केशवसुत उड्डाणपूलाखाली अनेक गाळे भाडेतत्वावर खासगी संस्थांना महापालिकेने चालवण्यास दिले होते. परंतु या पुलाखालील सर्व गाळ्यांमधील दुकाने महापालिकेने २०१३-१४ मध्ये पाडून गाळे रिकामे केले. हे गाळे तोडून टाकल्यानंतर येथील भाग झाडे-फुलांच्या बागा विकासित करून सर्व परिसर सुशोभित करण्यात येणार असल्याचे तत्कालिन जी/उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त शरद उघडे यांनी स्पष्ट केले होते. तसेच टॅक्सी थेट स्थानकाच्या शेजारी येईल, अशाप्रकारे वाहतुकीची व्यवस्था केली जाईल, असेही जाहीर केले होते. परंतु काही दिवस हे गाळे मोकळे राहिले असले तरी त्यानंतर या गाळ्यांमधील जागा फेरीवाल्यांनी अडवून त्या भाड्यांनी देण्यास सुरुवात केली. त्यामुळे पुढे या गाळ्यांमध्ये फेरीवाल्यांनी अतिक्रमण केल्याचे दिसून आले आहे.

- Advertisement -

सुशोभिकरण काहीही कामाचे नाही

परंतु जी/उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी या गाळ्यातील सर्व भिंती चित्रांद्वारे रंगवून स्थानकासमोरील भाग नेत्रदिपक करण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या यासर्व गाळ्यांमधील भिंतीचा परिसर बंदिस्त करून त्यामध्ये भिंत्तीचित्रके रंगवली जात आहे. आकर्षक स्वरुपाची ही चित्रे भिंतीवर उठून दिसून आहेत. परंतु महापालिकेने या भिंती रंगवल्या असल्या तरी त्याठिकाणी फेरीवाल्यांकडून होणारे अतिक्रमण कसे रोखणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे महापालिकेने पुलाखाली भिंतींना जिवंतपणा आणला असला तरी फेरीवाल्यांकडून होणारे अतिक्रमण रोखता न आल्यास हे सुशोभिकरण काहीही कामाचे नसल्याचे येथील स्थानिकांचे म्हणणे आहे. पुलाखालील हे सुशोभिकरण फेरीवाल्यांमुळेच झाकोळले जाईल, असे रहिवाशांचे म्हणणे आहे.


हेही वाचा – राज्यात प्रथमच लहान आतड्याचे प्रत्यारोपण

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -