Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी तानसा जलवाहिनीचे दुरुस्तीकाम पूर्ण; अंधेरी, धारावीचा पाणीपुरवठा पूर्ववत

तानसा जलवाहिनीचे दुरुस्तीकाम पूर्ण; अंधेरी, धारावीचा पाणीपुरवठा पूर्ववत

Subscribe

वई येथे पाणीपुरवठा करणारी तानसा जलवाहिनी शनिवारी दुपारच्या सुमारास अचानक फुटली. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले. पालिका जल अभियंता खात्याने ह्या जलवाहिनीच्या दुरुस्ती कामासाठी शनिवारी दुपारपासून रविवारी सकाळपर्यंत धारावी, अंधेरी/पूर्व या विभागातील पाणीपुरवठा बंद केला. तसेच, युद्धपातळीवर जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेऊन अवघ्या १२ तासांत म्हणजे रात्रभर जागून पहाटे पाच वाजेपर्यन्त पूर्ण केले.

मुंबई : पवई येथे पाणीपुरवठा करणारी तानसा जलवाहिनी शनिवारी दुपारच्या सुमारास अचानक फुटली. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले. पालिका जल अभियंता खात्याने ह्या जलवाहिनीच्या दुरुस्ती कामासाठी शनिवारी दुपारपासून रविवारी सकाळपर्यंत धारावी, अंधेरी/पूर्व या विभागातील पाणीपुरवठा बंद केला. तसेच, युद्धपातळीवर जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेऊन अवघ्या १२ तासांत म्हणजे रात्रभर जागून पहाटे पाच वाजेपर्यन्त पूर्ण केले. आता रविवारी या विभागाचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. त्यामुळे धारावी व अंधेरी/पूर्व या विभागातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. (Repair work of Tansa water channel completed Restoration of water supply to Andheri Dharavi)

मुंबईत सध्या या ना त्या कारणास्तव पाण्याची समस्या मुंबईकरांना विशेषतः उपनगर वासीयांना भेडसावत आहे. त्यातच, शनिवारी दुपारी ३:३० च्या सुमारास पवई परिसरातील तानसा जलवाहिनी अचानकपणे फुटली. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले. पालिका जलाभियंता खात्याने तात्काळ जलवाहिनी दुरुस्ती करण्याचा व तोपर्यंत धारावी व अंधेरी (पूर्व) विभागाचा पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला.

- Advertisement -

अवघ्या तासाभरात मुंबई महापालिकेच्या जल अभियंता खात्याच्या कामगार कर्मचारी अधिकाऱ्यांचा समावेश असलेली ८० जणांची चमू घटनास्थळी कामावर रुजू झाली. अभियंता, तंत्रज्ञ, कर्मचारी यांनी जलवाहिनीच्या आतमध्ये उतरून जलवाहिनी दुरुस्तीचे अवघड काम पार पाडले. विशेष म्हणजे रविवारी पहाटे पाच वाजेपर्यंत जलवाहिनी दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात आले. त्यामुळे रविवारी धारावी आणि अंधेरी (पूर्व) विभागाचा पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे.

या फुटलेल्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम अवघ्या १२ तासात पूर्ण करण्यासाठी पालिका जल अभियंता खात्याचे उप जल अभियंता (परिरक्षण) राजेश ताम्हणे, कार्यकारी अभियंता सुनील माने आणि अनील कोतकर यांनी विशेष मेहनत घेतली. तसेच, वसईला राहणारे व मुंबई महापालिकेच्या जल अभियंता खात्यातील नगर बाह्य विभागाचे सहाय्यक अभियंता पीटर रॉड्रिक्स यांनी घटनास्थळी प्रत्यक्ष व पूर्णवेळ उपस्थित राहून समन्वयाची जबाबदारी पार पाडली.

- Advertisement -

दुरुस्ती काम करताना, जलवाहिनीच्या आत मध्ये उतरून राजेंद्र हेगडे आणि अबरार शेख यांनी ‘वेल्डिंग’चे काम केले.तर जोडारींच्या अर्थात ‘फिटर’ चे काम रविंद्र चौधरी आणि राजेंद्र काशीद यांनी पार पाडले. दिवस – रात्र काम करून कामगिरी फत्ते करणाऱ्या या सर्वांचे महापालिका आयुक्त इकबाल चहल आणि अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.


हेही वाचा – ‘बार्टी’ फेलोशिपसाठी विद्यार्थ्यांचे ऊन-वाऱ्यात सलग ५० दिवस धरणे आंदोलन; मुख्यमंत्री लक्ष देणार का, विद्यार्थ्यांचा संतप्त सवाल 

- Advertisment -