घरताज्या घडामोडी'अवकाळी पाऊस, गारपीटीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे होणार'

‘अवकाळी पाऊस, गारपीटीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे होणार’

Subscribe

अवकाळी पावसामुळे १ हजार ७८ हेक्टर आणि गारपीटीमुळे ४८२ हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान झालं आहे, अशी माहिती वडेट्टीवार यांनी दिली.

राज्यात मागच्या दोन दिवसांपासून नाशिक, अमरावती, औरंगाबाद, पुणे या विभागात अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झालेले आहे. अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे एकूण १२९ गावांमधल्या २ हजार ८२० हेक्टर क्षेत्रावर पिकांचं नुकसान झालं आहे, यापैकी अवकाळी पावसामुळे १ हजार ७८ हेक्टर आणि गारपीटीमुळे ४८२ हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान झालं आहे, अशी माहिती वडेट्टीवार यांनी निवेदनाद्वारे विधानपरिषदेत दिली.

काय म्हणाले विजय वडेट्टीवार

शेतीपिकांच्या नुकसानीचा हा प्राथमिक अंदाज असून कृषी विभाग व महसूल विभाग यांच्याकडून संयुक्त पंचनामे झाल्यानंतर प्रत्यक्ष झालेल्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल, असे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी विधानपरिषदेत निवेदनाद्वारे सांगितले. इतर जिल्ह्यांमध्येही अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे झालेल्या नुकसानीबाबत पंचनामे करुन ते पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना मदत करण्याची कार्यवाही करण्यात येईल, असे मंत्री वडेट्टीवार यांनी सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा – नोटबंदीनंतरच्या वर्षात राज्यात ३१७ कारखाने बंद; १४,७८७ कामगार बाधित


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -